आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युराेपात मदत पॅकेजचा पाऊस!:जर्मनीत 5.2 लाख काेटीचे पॅकेज, स्पेनमध्ये 300 किमी रेल्वे प्रवास माेफत,  स्वीडनमध्‍ये स्वस्त वीज

बर्लिन,लंडनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आशिया, अमेरिकेपासून युराेपपर्यंतच्या देशांतील लाेकांना वाढत्या महागाईच्या झळा बसू लागल्या आहेत. खरेत युराेपीय देशांवर दुतर्फा संकट ओढवले आहे. युक्रेन-रशिया युद्धामुळे गॅसपुरवठ्यात तुटवडा निर्माण झाला आहे. हे त्यामागील एक कारण आहे. दुसरे म्हणजे अन्नधान्याचे दर वाढले आहेत. जर्मनी, ब्रिटनसह इतर देशांत थंडीच्या आधीच त्याबद्दल चिंता वाढू लागली आहे. कारण ताेपर्यंत गॅस व विजेच्या मागणीत दुपटीने वाढ झालेली असेल. हे लक्षात घेऊन अनेक सरकारने आतापासून पावले उचलायला सुरुवात केली आहे. जर्मनीने जनतेला दिलासा देण्यासाठी आणि देशाची अर्थव्यवस्था सक्रिय ठेवण्यासाठी ६५ अब्ज पाउंडच्या (सुमारे ५.१५ लाख काेटी रुपये) पॅकेजची घाेषणा केली आहे. अलीकडेच्या काळातील हे तिसरे आणि सर्वात माेठे पॅकेज आहे. स्पेनने जनतेला महागाईबाबत दिलासा देण्यासाठी रेल्वेतील प्रवास माेफत केला आहे. देशात लाेकांना ३०० किमीपर्यंत काेठेही रेल्वेने ये-जा करता येऊ शकेल. ही याेजना वर्षाच्या अखेरपर्यंत लागू राहील. स्वीडनने वीज उत्पादनात वेग आणण्यासाठी उद्याेगांना आणीबाणीतील निधी देण्याचे जाहीर केले आहे.

१९ देशांत महागाई ९ टक्क्यांहून जास्त, फ्रान्समध्ये कमी -युराेपातील १९ देशांत महागाई ९ टक्क्यांहून वर गेली आहे. वर्षापूर्वी महागाई दर केवळ ३ टक्के हाेता. -युराेझाेनच्या ९ देशांत महागाई १० टक्क्यांहून जास्त, याच क्षेत्रातील लिथुआनिया, लॅटव्हियामध्ये तर महागाई निर्देशांक २० टक्क्यांवर गेला आहे. -फ्रान्समध्ये महागाई ६.५ टक्के नाेंदवण्यात आली, युराेपातील सर्वात कमी. -गॅस व िवजेचे दर ऑक्टाेबरमध्ये वाढतील, असे ब्रिटनच्या नियामक संस्थेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे लाखाे लाेकांच्या अडचणीत भर पडणार आहे. -महागाई वाढण्यामागील सर्वात माेठे कारण म्हणजे इंधन दरात वाढ, इंधनाचे दर ३८.३ टक्क्यांनी वाढले.

उद्देश : अर्थचक्र गतिमान करण्याचे पॅकेजद्वारे प्रयत्न जर्मनीत वृद्धांना २४ हजार, तरुणांना १६ हजार रुपये जर्मनीत मदत पॅकेजअंतर्गत वृद्धांना प्रति महिना २४ हजार रुपये निवृत्तिवेतन मिळेल. विद्यार्थ्यांना १६ हजार रुपये महिना मिळेल. या आधी जर्मनीने दाेन वेळा २.३७ काेटी रुपयांच्या मदतीचे पॅकेज दिले. जर्मनीने नागरिकांना रेल्वेतून प्रति महिना ७१२ रुपयांची याेजना सुरू केली हाेती.

स्पेनमध्ये पर्यटकही करू शकतील माेफत प्रवास स्पेनमध्ये महागाई ११ टक्क्यांवर पाेहाेचली. त्यामुळे माेफत रेल्वे प्रवासाचा लाभ प्रवाशांसह पर्यटकांना देखील मिळणार आहे. खर्च वाढवा असाही याेजनेमागील उद्देश आहे. त्याद्वारे अर्थव्यवस्थेला गती िमळू शकेल. याेजनेमुळे सरकारच्या तिजाेरीवर १८०० काेटी रुपयांचा भार पडेल.

फिनलंड, स्वीडनला १.८३ लाख काेटींचा दिलासा फिनलंडमध्ये विजेचे दर वाढू नये यासाठी १.८३ लाख काेटी रुपयांचा प्रस्ताव आहे. स्वीडनने देखील वीज समस्येवर उपाययाेजना करण्यासाठी आणीबाणीचा निधी राखून ठेवला आहे. गाेल्डमॅन साॅक्स यांच्या म्हणण्यानुसार युराेचा दर सहा महिन्यांत १ डाॅलरहून खाली घसरण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...