आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मातीचे पुनरुज्जीवन:सद्गुरूंच्या ‘माती वाचवा’ अभियानाला 54 देशांचा पाठिंबा; वसुंधरा संवर्धनाचा संकल्प, सद्गुरू एकटे मोटारसायकवर 30 हजार किमीच्या 100 दिवसीय प्रवासावर आहेत

लंडन4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मातीचे पुनरुज्जीवन आणि पर्यावरण संरक्षणासाठी ईशा फाउंडेशनचे संस्थापक सद्गुरूंचे ‘माती वाचवा’ अभियान वसुंधरा संवर्धनाचे भवितव्य निश्चित करेल, असा विश्वास राष्ट्रकुल देशांच्या सचिवालयाने व्यक्त केला. या अभियानाचे उद्दिष्ट कॉमनवेल्थच्या लिव्हिंग लँड्स चार्टरशी सुसंगत असे आहे. ५४ देशांची राष्ट्रकुल संघटना मर्यादित नैसर्गिक साधन-संपत्तीचे संरक्षण व व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने सर्वांचे सहकार्य, कटिबद्धता, सामूहिक प्रयत्नांचे महत्त्व यांना महत्त्व देते. माती, हवामान बदल, भूमी रक्षण, जैवविविधता संकटात असल्याचे कॉमनवेल्थ सचिवालय मानते.

कॉमनवेल्थच्या ‘कॉल टू अॅक्शन ऑन लिव्हिंग लँड्स’चा उद्देश निसर्गाशी ताळमेळ साधणारी सामायिक दृष्टीचा शोध घेणे असा आहे. त्याशिवाय तीन कन्व्हेंशनमधील उद्दिष्टांची अंमलबजावणी करणे असा आहे. माती वाचवण्यासाठी सद्गुरूंच्या जागतिक प्रयत्नांना विविध पातळ्यांवर सातत्याने पाठिंबा मिळत आहे. माती वाचवण्यासाठी सध्या सद्गुरू एकटे मोटारसायकवर ३० हजार किमीच्या १०० दिवसीय प्रवासावर आहेत.

बातम्या आणखी आहेत...