आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • 54 Major Consequences Of The Corona Epidemic; Respect For Health Workers Increased, As Did Unemployment

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माेठे बदल:काेराेना महामारीचे 54 मोठे परिणाम; आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान वाढला, बेरोजगारीही

वॉशिंग्टन (लॅरी बुचानन)एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • संकटामुळे संपूर्ण जगभरात रोजचे आयुष्य बदलले, जाणून घ्या कोणकोणत्या गोष्टी झाल्या आहेत प्रभावित
  • वर्क फ्रॉम होम, मृत्युपत्र तयार करणे वाढले; प्रदूषण आणि गुन्हे घटले

कोरोनामुळे जगात ५८ लाखांपेक्षा जास्त लोक आजारी पडले आणि साडेतीन लाखांपेक्षा जास्त लोकांना जीव गमवावा लागला. हा मानवाच्या जीवनावरील गेल्या काही दशकांतील सर्वात मोठा धोका आहे. या महामारीने जगातील प्रत्येक गोष्ट बदलून टाकली. विशेषत: आमच्या रोजच्या आयुष्याशी संबंधित अशा गोष्टी बदलल्या ज्याबाबत अंदाज लावता येत नाही. तरीही आकड्यांशी खेळणारा आणि आमच्यातील सांख्यिकीय मेंदू ते मोजण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही जीवनाशी निगडित अशा गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न केला ज्यांच्यात वाढ होत आहे किंवा घट होत आहे. यात पर्यावरणापासून बेरोजगारी आणि गुन्हे तसेच अनेक उपयोगी गोष्टींचा समावेश आहे. यात सर्वात चांगली गोष्ट झाली आहे की, जगभरात आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान वाढला आहे आणि त्यांचे कौतुक होत आहे. मात्र, आरोग्यसेवेत त्यांना मिळणारा मोबदला खूप कमी आहे. आम्ही असेच ५४ बदल समजून घेण्याचा प्रयत्न केला.

आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान वाढला : संकटाच्या या काळात आरोग्य कर्मचारी देव म्हणून समोर आले. लोक टाळ्या, संगीत वाजवून त्यांचा सन्मान करत होते.

मास्क, डिस्टन्सिंग : सार्वजनिक वाहतुकीसह दुकाने व गर्दीच्या ठिकाणी लोक मास्क घातलेले दिसू लागले. फिजिकल डिस्टन्सिंगही ठेवू लागले. संसर्गाच्या काळात हा आयुष्याचा भाग झाला आहे. आरोग्याबाबत जागृती वाढली आहे.

बेरोजगारी वाढली : कोरोनाचा परिणाम रोजगारावर झाला. अमेरिकेत बेरोजगारीचे प्रमाण विक्रमी १४% च्या पुढे गेले. तज्ञांनुसार १९९८ नंतर पहिल्यांदा गरिबी वाढेल. सुमारे ५० कोटी वर्षअखेरीस गरिबीत सापडू शकतील.

अपेक्षेपेक्षा जास्त मृत्यू : कोरोना संकटात जगभरात झालेले मृत्यू अपेक्षेपेक्षा जास्त आहेत. अधिकृत आकडेवारी चित्र स्पष्ट दाखवत नाही, मात्र २४ देशांचा अभ्यास करून न्यूयॉर्क टाइम्सला दिसले की, या देशांमध्ये ७४ हजार मृत्यू जास्त झाले आहेत. यात असेही लोक असतील जे उपचारासाठी रुग्णालयात गेले नाहीत. अमेरिकेत ५७ हजार लोकांचा मृत्यू असाच झाला.

मृत्युपत्र बनवू लागले लोक : अकाली मृत्यूच्या भीतीने मृत्युपत्र तयार करू लागले. याचे कारण होते की, कोरोनाच्या उपचार किंवा मृत्यूच्या वेळी कुटुंब, मित्र किंवा जवळच्या कोणालाही यायची परवानगी नव्हती.

स्थलांतर आणि संसर्ग वाढला : महामारीचा प्रसार रोखण्यासाठी इतिहासात सर्वात मोठे प्रतिबंध लावण्यात आले, मात्र ते पुरेसे दिसले नाहीत. लोकांचा कामधंदा गेला, ते घरी परतू लागले. एकट्या वुहानमधून एकाच दिवसात १.७५ लाख लोकांनी शहर साेडले. कोरोनाचा प्रकोप पसरण्याची यापेक्षा दुसरी वेळ नव्हती.

लसीकरण, अवयव दानावर परिणाम : आरोग्याबाबत पूर्ण जगाचे लक्ष कोरोनावर केंद्रित होते. याचा जगभरात लसीकरणावर परिणाम झाला. यामुळे तज्ञांनी गोवर आणि पोलिओ पुन्हा होण्याचा इशारा दिला आहे. मृत्यू खूप झाले असले तरी संसर्गाच्या भीतीने अवयव दान व प्रत्यारोपण थांबले.

वाहतूक, अपघात घटले, वेग वाढला : लॉकडाऊन काळात वाहतूक बंद असल्याने रस्त्यांवर अपघात घटले, मात्र जी वाहने धावली त्यांचा वेग वाढला. मोकळ्या रस्त्यांवर लोक वेगाने वाहने चालवू लागली.

पर्यावरण सुधारले : जगभरात वाहतूक थांबल्याने ग्रीन हाउस गॅस आणि कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनावर झाला. फॉसिल फ्यूल आणि वाहनांचा वापर घटल्याने यात विक्रमी घट झाली. नव्या संशोधनानुसार या वायूंचे उत्सर्जन सुमारे ८% घटले.

गुन्हे घटले, मात्र चोऱ्या-फसवणूक वाढली : मोठे गुन्हे कमी झाले, मात्र चोऱ्या, फसवणूक वाढली. सुनसान शहरांचा फायदा घेत चोरांनी दुकाने, रेस्टाॅरंटना लक्ष्य केले. कोरोनाच्या नावाने ऑनलाइन आणि अाॅफलाइन फसवणूक वाढली.

ऑनलाइन झाले जगः वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन शिक्षण, ट्रेनिंग वाढले. बहुतांशी मुले घरातच थांबले. आवश्यक वस्तूंची होम डिलेव्हरी वाढली. वस्तूंना स्पर्श न करण्यासाठी ऑनलाइन मागणी वाढली. ई- लर्निंग, ई- गेमिंग, ई- बुक्स व ई- अटेन्डन्स वाढले.

स्क्रीन टाइम वाढलाः कोरोना महामारीच्या आधी आपण डिजिटल डिव्हाइस किंवा उपकरणांवरील वेळ कमी करणे आणि त्यांना जास्त बघणे थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, लॉकडाऊनमध्ये ते वाढवले. लोकांनी स्क्रीनवर जास्त वेळ घालवला.

विक्री वाढली, मात्र सोबत जेवणाची सवय गेली: लॉकडाऊनच्या काळात जगातील मोठी लोकसंख्या घरात राहिली. या वेळेचा उपयोग लोकांनी नव्या प्रयोगांसाठी केला. सर्वाधिक प्रयोग खाण्या- पिण्यावर झाला. मर्यादीत साधनांमध्ये सर्वाधिक विक्री पिठाची झाली. मात्र, फिजिकल डिस्टन्सिंगमुळे लोकांची एकत्र जेवण बनवणे व खाण्याची सवय कमी झाली.

बातम्या आणखी आहेत...