आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • 56 Hours Of Sleep Or Meal; We Stopped The Guns As Soon As We Faced The Taliban, Reached The Plane In The 5th Attempt; News And Live Updates

अफगाणिस्तान वाद:56 तास झोप ना जेवण; तालिबानशी सामना होताच बंदुका रोखल्या, 5 व्या प्रयत्नात विमानापर्यंत पोहोचलो

काबूल ​​​​​​​2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अफगाणिस्तानहून 150 भारतीयांना घेऊन विमान परतले; तेथील बिकट स्थितीबाबत वृत्तांत...

भारतीय दूतावासात १५ ऑगस्टच्या सकाळी ९ वाजता स्वातंत्र्य दिन साजरा झाला. इतक्यात स्फोटांचे आवाज येऊ लागले. तालिबानी ५० मीटरवरच हाेते. ते काबूलकडे जात असल्याचे माहीत होते. आमची २ विमाने काबूल एअरबेसवर होती. आम्ही ४६ जणांची पहिली टीम दूतावासाहून सुरक्षित विमानतळापर्यंत पोहोचवली. मात्र दुसऱ्या टीमसाठी आम्हाला भारतीयांना शहरातील विविध भागांतून आणावे लागले. त्यात मी, राजदूत, ९९ कमांडाे, ३ महिला व दूतावास स्टाफ होता. १५ ऑगस्टच्या संध्याकाळीच विमानतळाकडे निघालो, मात्र पोहोचू शकलो नाही. एका चेक पॉइंटवर सशस्त्र ग्रुपशी चकमक उडाली. त्यांनी हवेत गोळीबार केला, रॉकेट लाँचर काढले. आम्हीही बंदुका रोखल्या. वाटले, आज येथे शहीद होऊ नाहीतर एअरबेसपर्यंत पोहोचू.

मात्र काही क्षणांत स्थिती बदलली. आम्हाला युद्ध नव्हे तर अापल्या लोकांना सुरक्षित काढायचे होते. चकमक झडली असती तर मृत्यू झाले असते. मग आम्ही दूतावासात परतलो. १६ ऑगस्टच्या सायंकाळपर्यंत ४ वेळा निघण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रत्येक जागी सशस्त्र तालिबानी होते. दूतावासापासून विमानतळ १५ किमीवरच आहे. मग ठरवले, जे होईल ते होईल! रात्री १०.३० वाजता पुन्हा निघालो. अतिरेक्यांना चकवत रात्री ३.३० वाजता एअरबेसवर पोहोचूनच सुटकेचा नि:श्वास टाकला. आमच्या सी-१७ विमानाने पहाटे ५.३० वाजता उड्डाण केले व सकाळी ११.१५ वाजता गुजरातेत लँडिंग. तेथे जाेरदार स्वागत झाले. यानंतर हिंडन एअरबेसला आलो. ५६ तासांच्या या संपूर्ण घटनाक्रमात कुणीही झोपले नाही ना कुणी जेवले.

सरकार स्थापनेची तयारी
तालिबानचा संस्थापक बारादर अखुंद कंदहारला परतला, राष्ट्रपती होणार? तालिबानचा सहसंस्थापक मुल्ला बारादर अखुंद दोहा येथून कंदहारला परतला आहे. तो तालिबानचा राजकीय प्रमुख आहे. तालिबानी राजवटीत तो अफगाणिस्तानचा नवा राष्ट्रपती होऊ शकतो. तर, उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनी म्हटले आहे की, “राष्ट्रपती नसतील तर उपराष्ट्रपती हेच कार्यकारी राष्ट्रपती असतात. त्यामुळे मीच खरा कार्यवाहक राष्ट्रपती आहे. समर्थनासाठी नेत्यांशी संपर्क साधत आहे.’

अफगाणिस्तानातून आयात थांबल्याने भारतात सुका मेवा िकलोमागे २५० रुपयांनी महागला
अफगाणिस्तानातून भारतात होणारी सुक्या मेव्याची आयात थांबल्याने याचे भाव वाढू लागले आहेत. जम्मू ड्राय फ्रूट्स रिटेलर असाेसिएशनचे ज्योती गुप्ता म्हणाले, दहा दिवसांत अफगाणी बदाम, अंजीर, खुबानी, खिसमिस किलोमागे २०० रुपयांनी महागले आहेत. तर पिस्ता किलोमागे तब्बल २५० रुपयांनी महाग झाला आहे.

भारतीय दूतावासावर होती तालिबानची नजर, अमेरिकेशी रणनीती आखून परतता आले
वृत्तसंस्थांनुसार, तालिबान भारतीय वकिलातीवर ताबा मिळवू पाहत होते. कर्मचाऱ्यांचे साहित्य-सामान त्यांनी पळवले होते. विमानतळाचा मार्गही बंद केला होता. या स्थितीत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकी परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकेन व एनएसए अजित डोभाल यांनी अमेरिकेचे सुरक्षा सल्लागार जॅक सुलिवान यांच्याशी चर्चा केली. काबूल विमानतळावर अमेरिकी सुरक्षा व्यवस्थेत विमान भारताकडे रवाना झाले. भारत काही लोकांसाठी आपत्कालीन ई-व्हिसा जारी करेल.

मायदेशी परतल्यावर असे स्वागत
भारतीय राजदूतांसह १५० लोकांना घेऊन आलेले विमान सी-१७ जामनगर येथे उतरले. सरकारनुसार, सुमारे १६०० हून अधिक लोकांनी भारतात परतण्यासाठी अर्ज केले आहेत.

बातम्या आणखी आहेत...