आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूकंप:इंडोनेशियात 5.6 तीव्रतेचा भूकंप; 162 लोक ठार

जकार्ता6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंडोनेशियाचे पश्चिम जावा राज्य सोमवारी ५.६ तीव्रतेच्या भूकंपाने हादरले. यात १६२ पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. पश्चिम जावाचे गव्हर्नर रिदवान कामिल यांनी सांगितले की, ७०० पेक्षा जास्त नागरिक जखमी आहेत. भूकंप दाट लोकसंख्येच्या भागात बसला. यामुळे मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. प्रशांत क्षेत्रातील भूगर्भीय हालचालींच्या हिशेबाने इंडोनेशिया “रिंग ऑफ फायर’च्या वर वसले आहे. २०१८ मध्ये इंडोनेशियात भूकंप आणि सुनामी आल्याने हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.

अमेरिकी भूगर्भ सर्वेक्षणानुसार, भूकंप ५.६ तीव्रतेचा होता. त्याचे केंद्र पश्चिम जावा राज्याच्या सियानजूर क्षेत्रात १० किमी खाेल होते. प.जावाच्या एका रुग्णालयात जखमी लोक मोठ्या प्रमाणात दाखल झाले.

बातम्या आणखी आहेत...