आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3 महिन्यांनी पुन्हा तीच जिवघेणी चूक:कॅनडामार्गे अमेरिकेत दाखल होणाऱ्या 6 भारतीयांना अटक, मोडक्या नावेतून करत होते प्रवास

वॉशिंग्टन18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॅनडातून अमेरिकेत अवैधपणे प्रवेश करण्याच्या प्रयत्नांत असणाऱ्या 7 जणांना अटक करण्यात आली आहे. यात 6 भारतीयांचा समावेश आहे. अमेरिकन पोलिसांनी हा मानवी तस्करीचा प्रकार असल्याचा दावा केला आहे. यासंबंधीच्या वृत्तानुसार, हे लोक प्रवास करत असणारी नाव बुडण्याच्या बेतात होती. आरोपी 19 ते 21 वर्ष वयोगटातील आहेत.

जवळपास 3 महिन्यांपूर्वी गुजरातच्या एकाच कुटूंबातील 4 जण कॅनडाला गेले होते. ते तेथील एका मानवी तस्कराच्या मदतीने अमेरिकेत शिरण्याचा प्रयत्न करत होते. उणे 35 अंश सेल्सिअस व बर्फाळ वादळात अडकल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. मृतांत 2 मुले व त्यांच्या पालकांचा समावेश होता.

गोपणीय माहितीच्या आधारावर कारवाई

अमेरिकेच्या अॅक्वेस्ने मोहॉक पोलिसांना आठवड्यापूर्वी कॅनडाच्या ओंटारियोतून एका नावेच्या माध्यमातून काही व्यक्तीची अमेरिकेत तस्करी होणार असल्याची खबर मिळाली होती. पोलिसांना चौकशीत सेंट रेजिस नदीत एक नाव बुडत असल्याचे आढळले. त्यानंतर बचाव पथकाच्या मदतीने त्यांना वाचवण्यात आले. तपासात हे सर्वजण अवैधपणे अमेरिकेत प्रवेश करत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

जगदीश बलदेवभाई पटेल (35), त्यांची पत्नी वैशालीबेन (33), मुलगी विहंगा (गोपी ) (12 ) व 3 वर्षीय मुलगा धार्मिक याचा 3 महिन्यांपूर्वी अशाच एका घटनेत मृत्यू झाला होता.
जगदीश बलदेवभाई पटेल (35), त्यांची पत्नी वैशालीबेन (33), मुलगी विहंगा (गोपी ) (12 ) व 3 वर्षीय मुलगा धार्मिक याचा 3 महिन्यांपूर्वी अशाच एका घटनेत मृत्यू झाला होता.

बोटीत सुरक्षा उपकरण नव्हते

पोलिसांनी सांगितले, हे सर्वच लोक लाइफ जॅकेटशिवाय बोटीतून प्रवास करत होते. रक्त गोठवणाऱ्या थंडीमुळे त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बोटीत लाइफ जॅकेट, लाइफ रिंग व दोरी सारखी कोणतीही सामग्री नव्हती. अमेरिकेत मानवी तस्करीप्रकरणी 10 वर्षांची शिक्षा होऊ शकते.

तीन महिन्यांपूर्वी गुजरातच्या एका कुटूंबाचा कॅनडात मृत्यू झाला होता. तेव्हा कॅनडा व भारत या दोन्ही सरकारांनी या प्रकरणाची चौकशी केली होती.

अमेरिका-कॅनडा सीमेवर झाला आहे 4 भारतीयांचा मृत्यू

3 महिन्यापूर्वी एका भारतीय कुटूंबाने अमेरिकेत अवैधपणे शिरण्याचा प्रयत्न केला होता. पण, त्यात या कुटूंबातील चारही जणांचा मृत्यू झाला होता. हे सर्वजण गुजरातचे नागरिक होते. त्यांचा उणे 35 तापमान व बर्फाळ वादळामुळे मृत्यू झाला होता.

4 जणांच्या या कुटूंबात आई-वडिलांसह 2 मुलांचा समावेश होता. कॅनडाच्या अधिकाऱ्यांच्या मते, गुजरातचे हे कुटूंब टूरिस्ट व्हिजावर कॅनडात पोहोचले होते. त्यानंतर त्यांनी अवैधपणे अमेरिकेत जाण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी भारतीय परराष्ट्र मंत्रालयानेही कठोर भूमिका घेतली होती. परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी या प्रकरणी कॅनडात उपस्थित भारताच्या राजदुतांकडून स्पष्टीकरण मागवले होते.

बातम्या आणखी आहेत...