आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जगात कोरोना:जगभरात कोरोना रुग्ण 6 कोटींवर; 60 दिवसांत दुप्पट, रशियात एका दिवसात 500 हून जास्त मृत्यू

मॉस्को2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जर्मनी : लाॅकडाऊन वाढवण्याच्या तयारीत

जगभरात कोरोना रुग्णांची संख्या ६ कोटींहून जास्त झाली आहे. मंगळवारी ५,४३,३२९ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे ही संख्या ६,०२,४०,०६१ झाली आहे. यंदा १६ सप्टेंबर पर्यंत एकूण ३,०१,९३,६५२ रुग्ण आढळून आले होते. म्हणजे ६० दिवसांत जगभरात कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे. आतापर्यंत १४,१७,८५८ मृत्यू झाले. त्यापैकी बहुतांश अमेरिकेत २,६५,९८६ एवढे आहेत. रशियात पहिल्यांदा एका दिवसात सर्वाधिक ५०७ मृत्यू झाले. याआधी येथे एका दिवसात ५०० हून कमी मृत्यूची नोंद आहे. रशियात आरोग्य कर्मचारी आैषधी तसेच इतर सुविधांचा अभाव असल्याची तक्रार करत आहेत. कोरोनाची दुसरी लाट असूनही रशियातील ८५ प्रशासकीय क्षेत्रांपैकी केवळ एका क्षेत्रात लॉकडाऊन लागू आहे. राष्ट्रपती व्लादिमिर पुतीन यांनी परिस्थिती अतिशय वाईट असल्याचे आधीच स्पष्ट केले आहे. रशियात २,६५,००० कोविडच्या रुग्णांसाठी खाटा उपलब्ध आहेत. त्यापैकी ८० टक्के भरलेल्या आहेत. बहुतांश प्रशासकीय क्षेत्रात ९० टक्के खाटा भरलेल्या आहेत. आतापर्यंत रशियात ३७ हजार ५३८ मृत्यू झाले आहेत. दुसरीकडे मृत्यूची खरी संख्या तीनपट जास्त असू शकते.

जर्मनी : लाॅकडाऊन वाढवण्याच्या तयारीत
जर्मनीच्या अनेक भागात अंशत: लॉकडाऊन २० डिसेंबरपर्यंत वाढवण्याची तयारी केली जात आहे. त्यासाठी चान्सलर अँजेला मर्केल १६ प्रांतीय नेत्यांची बैठक घेतील. सरकार काही नवे नियम लागू करण्याच्या तयारीत आहे. त्यानुसार ५ पेक्षा जास्त लोकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र येता येणार नाही.

फ्रान्समध्ये अनलॉक
फ्रान्समध्ये पंतप्रधान इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी २८ नोव्हेंबरपासून राष्ट्रीय पातळीवर अनलॉकची घोषणा केली आहे. लोकांना नीटपणे नाताळ साजरा करता यावा यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे मॅक्रॉन यांनी जाहीर केले. बाजारपेठ खुली राहणार आहे. फ्रान्समध्ये दुसऱ्या लाटेने उच्च शिखर गाठले आहे. आता १५ डिसेंबरनंतर आणखी सवलत दिली जाणार आहे.

टोकियो बाहेर बंदी
जपानच्या टोकियोमध्ये प्रशासनाने लोकांना बाहेर प्रवास करणे, बार, रेस्तराँ सुरू करण्यास मनाई करणार आहे. त्यासाठी प्रशासन तयारीत आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser