आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटन:6 वर्षांच्या मुलाने चाेरले 67 लाखांचे साेन्याचे घड्याळ, आई-वडिलांनीच दिले चाेरीचे धडे

लंडन7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरोपी आई-वडील इली व मार्ट - Divya Marathi
आरोपी आई-वडील इली व मार्ट

एका सहा वर्षांच्या मुलाने ६७ लाख रुपयांची चाेरी केली. या चाेरीसाठी आई-वडिलांनीच त्याला प्रशिक्षण दिले. आई-वडिलांनी सांगितलेल्या रस्त्यावरून चालत मुलाने दुकानातून १८ कॅरेट साेन्याचे घड्याळ चाेरले. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इली पारा आणि मार्टा ब्लाेज चाेरी करण्याच्या आधी लक्झरी दुकानात गेले हाेते. त्या वेळी त्यांनी या घड्याळाचा फाेटाे काढला हाेता. पाच दिवसांनंतर ते आपल्या मुलासह त्या दुकानात गेले आणि त्या वेळी मुलाने माेठ्या शिताफीने हे घड्याळ चाेरले.

या जाेडप्याने आपल्या मुलाला बनावट घड्याळ देऊन पाठवले. त्याने चाेरलेल्या घड्याळाच्या जागी हे घड्याळ ठेवले. त्यामुळे दुकानाच्या कर्मचाऱ्यांना ही चाेरी तातडीने पकडता आली नाही. चाेरीच्या घटनेनंतर राेमानियामध्ये राहणारे हे जाेडपे ब्रिटन साेडण्याच्या तयारीत हाेते. ते पळून जाण्याच्या आधीच पाेलिसांनी त्यांना अटक केली. न्यायालयाने मुलगा आणि वडिलांना १८ महिने आणि आईला आठ महिन्यांची शिक्षा सुनावली आहे.

बातम्या आणखी आहेत...