आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

अमेरिका:कोरोनाचे केअरहोम्समध्ये 60 हजार रुग्ण, 26 हजार मृत्यू, सीडीसीच्या अहवालात मोठा खुलासा

वॉशिंग्टन2 महिन्यांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • आकडा वाढेल, कारण हा अहवाल केवळ 80% केअर होम्सचा
Advertisement
Advertisement

अमेरिकेत कोरोनामुळे केअर होम्समध्ये २६ हजारांहून जास्त मृत्यू झाले आहेत. सर्वोच्च आरोग्य संस्था सीडीसी व मेडिकेअर अँड मेडिकेटेड सर्व्हिसेस सेंटरच्या (सीएमएस) अहवालात हा दावा केला गेला आहे. हा अहवाल केवळ अमेरिकेतील ८० टक्के केअर होम्सचा असल्यामुळे मृत्यूंची संख्या ही यापेक्षा जास्त असू शकते. अमेरिकेत कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी एक तृतीयांश मृत्यू केअर होममध्ये झाले आहेत, असेच यातून स्पष्ट होते. हा अहवाल अमेरिकेच्या सर्व गव्हर्नर्ससाठी तयार करण्यात आला आहे, जेणेकरून ते आणखी दक्ष राहतील. केअर होममध्ये ६० हजार प्रकरणे नोंदवली गेली आहेत. देशात १५,४०० नोंदणीकृत केअर होम आहेत. अहवालात दिलेली आकडेवारी २४ मेपर्यंतची आहे. सीडीसीचे संचालक रॉबर्ट रेडफील्ड आणि सीएमएस प्रशासक सीमा वर्मा यांनी सांगितले की, देशभरातील आकडेवारीतून विषाणूमुळे केअर होमची स्थिती खराब असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सिंगापूर : ९४ % रुग्ण डॉरमेट्रीतील

सिंगापूरमधील ९४ टक्के रुग्ण डोरमेट्रीत आढळले आहेत. येथे ४३ डोरमेट्रीत सुमारे २ लाख स्थलांतरित कामगार राहतात. आता सरकार येथे एक लाख स्थलांतरित कामगारांसाठी आणखी डोरमेट्री बनवणार आहे. राष्ट्रीय विकास मंत्रालयाने यास दुजोरा दिला. सिंगापूरमध्ये १४ लाख स्थलांतरित कामगार आहेत. बांधकाम आणि घरगुती कामात अधिक कामगार गुंतलेले आहेत. जागेच्या अडचणींमुळे सुमारे २० लोकांना एका खोलीत राहावे लागत आहे. सिंगापूरमध्ये ३५२९२ रुग्ण आढळले असून ५४४ मृत्यू झाले आहेत.

Advertisement
0