आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुर्कीमध्ये 6.1 तीव्रतेचा भूकंप:लोक घाबरून घराबाहेर, 1999 मध्ये झालेल्या भूकंपात 845 लोकांचा मृत्यू

9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुर्किये (जुने नाव तुर्की) येथे भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 6.1 इतकी मोजली गेली. भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की राजधानी अंकारा, इस्तंबूल आणि आसपासच्या परिसरात राहणारे लोक घाबरून घराबाहेर पडले. सध्या तरी भूकंपामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.

न्यूज एजन्सी एपीने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू दुजसे प्रांतातील गोलकाया येथे होता. हे शहर इस्तंबूलपासून 200 किलोमीटर अंतरावर आहे. या शहरात 1999 मध्ये सर्वात धोकादायक भूकंप झाला होता, ज्यामध्ये 800 लोकांचा मृत्यू झाला होता.

स्थानिक लोकांच्या प्रतिक्रिया
अंकारामध्ये राहणारे ओमेर अनस म्हणाले- पहाटे 4च्या सुमारास मला जाग आली. इमारत हादरत होती. खोलीत ठेवलेले पुस्तकांचे कपाट अचानक पडले. मी घाबरलो आणि घराबाहेर पडलो. गेल्या आठवड्यातच प्रशासनाने भूकंप प्रतिबंधक ड्रिल केली होती. अंकारामध्ये भूकंपाचे इतके तीव्र धक्के मला कधीच जाणवले नाहीत. मला आशा आहे की लोक सुरक्षित असतील. दुसऱ्या एका व्यक्तीने भूकंपाचे वर्णन सर्वात धोकादायक असल्याचे सांगितले. अबिफाताह अदान म्हणाले- मला भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. अपार्टमेंटमध्ये एक विचित्र कंपन होते. इमारत कोसळणार आहे असे वाटत होते. सगळे बाहेर येऊन रस्त्यावर जमले.

जगात दरवर्षी 20,000 भूकंप होतात
जगात दरवर्षी अनेक भूकंप होतात, पण त्यांची तीव्रता कमी असते. राष्ट्रीय भूकंप माहिती केंद्र दरवर्षी सुमारे 20,000 भूकंपांची नोंद करते. यापैकी 100 भूकंप असे आहेत की त्यामुळे जास्त नुकसान होते. भूकंप काही सेकंद किंवा काही मिनिटे टिकतो. इतिहासातील सर्वात जास्त काळ टिकणारा भूकंप 2004 मध्ये हिंदी महासागरात झाला होता. हा भूकंप 10 मिनिटे चालला.

बातम्या आणखी आहेत...