आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
१९६० नंतर ४० अंशांवर पाेहाेचले तापमान, हवामान बदलाचा परिणाम
पर्थ । २.५५ काेटी लाेकसंख्येचा आॅस्ट्रेलिया एकीकडे काेराेनाशी लढताेय. दुसऱ्या बाजूला तापमान वाढीमुळे वणव्यांची माेठी समस्या निर्माण झाली आहे. लाॅकडाऊनचा मुकाबला करणाऱ्या पर्थला वणव्याला ताेंड देण्याची वेळ आली आहे. या वणव्यात २५ हजारांवरील वनक्षेत्रासह ८० घरेही खाक झाली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे २५० कर्मचारी आणि दाेन हेलिकाॅप्टर युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत.
जानेवारी-फेब्रुवारीत आॅस्ट्रेलियात सरासरी तापमान १७ ते २५ अंशांदरम्यान असते. परंतु यंदा ते ४०.२ अंशांपर्यंत पाेहाेचले. त्यामुळे प्रचंड उकाडा जाणवू लागलाय. उष्णतेचा ६१ वर्षांचा विक्रम यंदा माेडीत निघाला. या आधी १९६० मध्ये ३७.२ अंश तापमान नाेंदले गेले हाेते. हवामान बदलामुळे तापमानात वाढ हाेत आहे. वादळी वाऱ्याने वणवा आणखी पसरू लागल्याचे संशाेधकांनी सांगितले.
न्यूजर्सीमध्ये तीन दिवसांत 3 फुटांहून जास्त बर्फ साचला
न्यूजर्सी । अमेरिकेत या आठवड्यात धडकलेल्या ‘आेर्लेना’ हिमवादळामुळे न्यूजर्सीला झाेडपले. या भागात सुमारे ४० इंच (३ फुटांहून जास्त) बर्फ साचला. याबराेबरच १२२ वर्षांचा विक्रम माेडला आहे. या वादळामुळे न्यूयाॅर्क, वाॅशिंग्टन, बाेस्टनसह २० हून जास्त राज्यांत बर्फवृष्टी झाली. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. वाहतूक ठप्प झाली. हजाराे उड्डाणे रद्द झाली आहेत. न्यूजर्सीच्या आर्लिंग्टनमध्ये ४० इंची बर्फ साचला हाेता. या आधी १८९९ मध्ये येथे ३४ इंच बर्फ साचला हाेता. अटलांटिक क्षेत्रातील िहमवाऱ्यांमुळे पूर्व अमेरिकेत बर्फवृष्टी झाली. ताशी सुमारे ९० किमी वेगाने वारे वाहू लागले आहेत. गुरुवारी मात्र वादळाचा जाेर काहीसा कमी झाला असून ते इंग्लंडच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.