आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

दुसऱ्या लाटेचा धोका:अमेरिकेत एका दिवसात 61 हजार रुग्ण; ऑस्ट्रेलियात परतण्यास बंदी

वॉशिंग्टन / लंडनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
टोकियोच्या इकेबुकुरोमध्ये रात्रीही वर्दळ दिसून आली.
  • कोरोनावर नियंत्रण असलेल्या देशांतही संख्या वेगाने वाढतेय

कोरोना संसर्गामुळे अमेरिकेची स्थिती वाईट आहे. गेल्या चोवीस तासांत कोरोनाचे नवे ६१ हजार ६७ रुग्ण आढळले. एकाच दिवसातील हा रुग्णसंख्येचा नवा विक्रम ठरला. या आधी मंगळवारी ६० हजार २०० रुग्ण आढळले होते. गेल्या दहा दिवसांत ५० हजारांहून जास्त रुग्ण आढळून आलेला गुरुवार हा सहावा दिवस ठरला. चोवीस तासांत कोरोनामुळे एक हजारांहून जास्त लोकांचा मृत्यू झाला. देशात ३० लाखांहून जास्त बाधित आहेत. आतापर्यंत एकूण १ लाख ३३ हजार १९५ जणांचा मृत्यू झाला आहे. दक्षिण, पश्चिमेकडील राज्यांत सर्वाधिक रुग्ण आहेत. कारण सर्वात आधी अनलॉक याच क्षेत्रात झाले होते. गुरुवारी अल्बामा, इदाहो, ऑरेगॉन, टेक्सास, मिसोरी व माँटोनामध्ये विक्रमी रुग्ण आढळून आले.

ऑस्ट्रेलियात उड्डाणे निम्म्यावर : ऑस्ट्रेलियाने परदेशातून येणारी उड्डाणे निम्म्यावर आणण्याचा निर्णय घेतला. या बंदीनुसार देशात परतणाऱ्या नागरिकांची संख्याही ४ हजारांपर्यंत मर्यादित करण्यात आली. मायदेशी आलेल्यांना क्वाॅरंटाइन राहावे लागणार आहे. देशात ९ हजार ३५९ बाधित असून १०६ जणांचा मृत्यू झाला.

जपान : नाइट लाइफमुळे वाढला संसर्ग; तरुणांना फटका

जपानमध्ये शुक्रवारी २४३ रुग्ण आढळून आले. या आधी गुरुवारी २२४ रुग्ण आढळले होते. टोकियोचे गव्हर्नर युरिको कोइके म्हणाले, २०-३० वर्षीय तरुणांत वेगाने संसर्ग पसरतोय. शहरातील नाइट लाइफ हेच त्यामागील मोठे कारण आहे. घरात राहण्याच्या आवाहनाला तरुण जुमानत नाहीत. आणीबाणी लावून जपानने मेपर्यंत परिस्थिती कशीबशी नियंत्रणात ठेवली होती. देशात २० हजार ३७१ रुग्ण आहेत, तर १ हजारांहून कमी मृत्यू झाले. टोकियोत ७ हजार ३०० रुग्ण आहेत आणि ३२५ जणांनी प्राण गमावले. दुसरीकडे जपानमध्ये सतत पाऊस आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती तज्ञांनी वर्तवली.

पाकमध्ये संख्या ५ हजार पार, रुग्णालये फुल्ल, ऑक्सिजनचा तुटवडा

पाकिस्तानात कोरोनामुळे ५ हजार ५८ जणांचा मृत्यू झाला. २.४३ लाख लोक बाधित आहेत. देशातील आरोग्य व्यवस्था पार कोलमडली आहे. रुग्णालयांत खाटा शिल्लक नाहीत. एप्रिलपासून महामारी सुरू झाली. त्यानंतर १० हजार सिलिंडरचा पुरवठा वाढला आहे. चर्चित इंडस रुग्णालयाने ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने रुग्णांना घरीच उपचार करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पाकिस्तानातही अनलॉकनंतर रुग्णसंख्येत वाढ झाली. ऑगस्टपर्यंत रुग्णवाढ पाचपटीने होऊ शकते, असे सरकारला वाटते. डिस्टन्सिंग नसल्याचे डाऊ विद्यापीठाचे प्रमुख सईद कुरैशी यांनी म्हटले आहे की, लोक मास्कही लावत नाहीत.

0