आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ड्रॅगनची चिंता:64 लाख कोटींचा प्रकल्प फसल्याने चीनची गोची; अमेरिकेकडून चीनची घोर नाकेबंदी, प्रत्‍येक प्रोजेक्‍टवर लक्ष

वाॅशिंग्टन3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चीनने सुरू केलेली महत्वाकांक्षी बेल्ट अँड राेड याेजनेची (बीआरआय) काेंडी झाली आहे. १४० हून जास्त देशांत पोहोचलेल्या व ६४ लाख कोटी रुपयांच्या प्रकल्पाला विविध कारणांनी आव्हानांना ताेंड द्यावे लागत आहे. या आव्हानांमध्ये पर्यावरणीय समस्या, भ्रष्टाचार-घाेटाळे, प्रकल्प असलेल्या देशांतील अंतर्गत राजकारण व श्रमिक कायद्याच्या उल्लंघनाचा समावेश आहे. त्याशिवाय ‘कर्जाच्या जाळ्यात अडकवणे’ या नीतीचा पर्दाफाश हाेणे हेही याेजना रखडण्याचे एक कारण आहे.

प्रकल्पाच्या आडून आपल्या स्थानिक पायाभूत व्यवस्थेवर ताबा मिळवण्याचा चीनचा डाव आहे, असा आराेप अनेक देशांनी चीनवर केला आहे. चीनसह अनेक जागतिक प्रकल्पांच्या खर्चावर निगराणी करणाऱ्या अमेरिकेची संशाेधन संस्था विल्यम अँड मॅरी रिसर्च लॅबच्या म्हणण्यानुसार चीनच्या ३५ टक्के याेजना रखडल्या आहेत. त्यात पुढे काही काम हाेताना दिसत नाही. अमेरिकेने अशा याेजनांना आव्हान देण्यास सुरुवात केली. आपल्या याेजनेला वास्तविक रूप देण्यासाठी बायडेन अनेक देशांचा दाैरा करत आहेत. चीनची बीआरआय याेजना २०१३ मध्ये सुरू झाली हाेती. चीनने २०१३ ते २०१७ पर्यंत सातत्याने चार वर्षे ८५ अब्ज डाॅलर (सुमारे ६.७५ लाख काेटी रुपये) एवढी दरवर्षी गुंतवणूक केली. जगातील काेणत्याही देशाने परदेशातील केलेल्या गुंतवणुकीपेक्षा ही दुप्पट रक्कम असल्याचे सांगितले जाते. बीआरआय अंतर्गत पापुआ न्यू गिनिआ ते केनियापर्यंत आणि हवाईपासून श्रीलंका ते पश्चिम आफ्रिकेपर्यंत बंदरांवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न झाले.

चीन अमेरिका : २५ देशांत विरोध, अमेरिकेची आफ्रिका व प्रशांत क्षेत्रात कवायत
-चीनचे कर्ज अनेक देशांसाठी समस्या आणणारे ठरले आहे. प्रकल्पासाठी कर्ज चीन सरकारएेवजी चीनच्या कंपन्यांमार्फत दिले जाते. त्यासाठी सरकारला हमी द्यावी लागते. हीच बाब विविध देशांतील सरकारांसाठी अडचणीची ठरत आहे.
-चीनने प्रकल्प पर्यावरणास पूरक असल्याचा दावा केला. प्रत्यक्षात खाेटा दावा उजेडात आला.

चीनची पाकिस्तानात ५ लाख काेटींची गुंतवणूक

-पाकिस्तानात चीनने सीपॅक अंतर्गत केलेल्या गुंतवणुकीला स्थानिकांनी तीव्र विराेध केला आहे. त्यास सतत विराेध आहे. - बलुचिस्तानमधील ग्वाडेर शहरात विराेध जास्त तीव्र आहे. स्थानिक मच्छीमारांनी त्यास विराेध केला आहे.

-श्रीलंका दिवाळखाेरीत निघाल्याने हंबनटाेटा बंदर, काेलंबाे बंदर याेजना बारगळल्यात जमा आहे. त्यामुळे अडचण आहे.

विनाजप्तीचे कर्ज
-चीनला आव्हान देताना अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन यांनी जूनमधील जी-७ देशांच्या बैठकीत गेम चेंजिग याेजनेची घाेषणा केली. २०२७ पर्यंत ६०० अब्ज डाॅलर ( सुमारे ४८ लाख काेटी रुपये) गुंतवणूक केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यापैकी १६ लाख काेटी रुपये अमेरिका गुंतवणूक करेल. कर्जाच्या अटीत जप्ती नाही. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी सब सहारा आफ्रिका स्ट्रॅटेजी जाहीर केली .

बातम्या आणखी आहेत...