आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:सिंगापूरच्या 64% लोकांना चीन अमेरिकेपेक्षा चांगला वाटतो,  52 % भारतवंशीयांचाही कल

सिंगापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सिंगापूरची बदललेली मानसिकता पाहणीतून स्पष्ट

भारत व चीनचे संबंध भलेही तणावपूर्ण असले तरी सिंगापूरमधील भारतवंशीयांचा कल चीनकडे जास्त आहे. जून २०२१ मध्ये प्यू रिसर्च सेंटरने एक पाहणी केली होती. सिंगापूरचे ६४ टक्के लोक चीनला अमेरिकेच्या तुलनेत जास्त सकारात्मक मानतात. तेथे वास्तव्याला असलेले ५२ टक्के भारतीय तसेच ४२ टक्के मलय समुदायदेखील चीनविषयी सकारात्मक विचार करतो. सिंगापूरमधील ७२ टक्के चीनचे लोकही मायदेशाच्या बाजूने उभे असल्याचे दिसतात. या नागरिकांना अमेरिका चीनच्या तुलनेत आर्थिक व सैन्य पातळीवर कमकुवत वाटते. कम्युनिस्ट विचारसरणी असूनही नागरिकांच्या मानसिकतेत झालेला हा बदल आहे. हा बदल पन्नाशीतील मायकल चॅन यांच्यामुळे घडून आला आहे.

चॅन जगातील सर्वात मोठा ऑनलाइन क्लास चालवतात. चॅन शिकवणीच्या क्षेत्रातील एक दिग्गज नाव आहे. लाखो लोकांनी गेल्या वर्षी त्यांंना फॉलो करण्यास सुरुवात केली. चीनमध्ये सोशल मीडियाच्या वापरावर निर्बंध लागू आहेत. त्यामुळे जगभरातील लोक चीनपासून दूर गेले आहेत. म्हणूनच चॅन खरी माहिती पोहोचवण्याचे काम करतात. चीनचे परराष्ट्र मंत्रालयदेखील अशाच प्रकारचे प्रयत्न करत आहे. चीन वेगाने विकसित होणारा देश असल्याची धारणा आता सिंगापूरच्या नागरिकांची झाली आहे. चीनने जपानला प्रत्येक क्षेत्रात पिछाडीवर टाकून विकास साध्य केला आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये फ्रान्सच्या थिंक टँकने सिंगापूरमध्ये प्रभाव नसल्याचे म्हटले होते.

सिंगापूरची मदत करून ‘यंग सिंगापूर’
सिंगापूरमध्ये संमेलन आयोजित करण्यासाठी काही वर्षांपासून चीन मदत करू लागला आहे. परदेश प्रवास, परदेशातील शिक्षणासाठी चीनने संपूर्ण रोड मॅप तयार केला. चीन येथील गावोगावी जाऊन यंग सिंगापूर अभियान राबवू लागला. चीनने लक्ष केंद्रित केले आहे.

बातम्या आणखी आहेत...