आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मस्क यांनी केली शुल्क आकारण्याची घोषणा:टि्वटर ब्लू टिकसाठी दरमहा 650 रु.शुल्क

न्यूयॉर्कएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

टि्वटरच्या ब्लू टिकसाठी दरमहा ८ डॉलर (सुमारे ६५० रु.) शुल्क आकारण्याची घोषणा कंपनीचे नवे मालक एलन मस्क यांनी केली आहे. अर्थात प्रत्येक देशात हे शुल्क वेगळे असेल असेही मस्क यांनी स्पष्ट केले.

देशाची क्षमता व क्रयशक्तीच्या आधारे शुल्क आकारणी केली जाणार आहे. पेड सबस्क्रिप्शन वापरकर्त्यांना रिप्लाय, मेन्शन आणि सर्चमध्ये प्राधान्य मिळणार आहे. तसेच त्यांना जाहिरातीही कमी दिसतील. याशिवाय दीर्घ व्हिडिआे आणि आॅडिओ पोस्ट करण्याचीही सुविधा मिळेल. यामुळे कंटंेट क्रिएटर्सना पुरस्कृत करण्यासाठी टि्वटरला महसूल गोळा करता येईल. स्पॅम आणि बनावट अकाउंट बंद करण्यात येणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...