आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • 66 Lakh Citizens Imprisoned In Lockdown As Soon As There Was Opposition 31,454 Patients, The Highest In China During The Corona Era

विरोध होताच 66 लाख नागरिक लॉकडाऊनमध्ये कैद:31,454 रुग्ण, चीनमध्ये ते कोरोनाकाळात सर्वाधिक

चीन2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. गुरुवारी ३१,४५४ नवे रुग्ण आढ‌ळले. कोरोनाकाळात ते सर्वाधिक आहेत. यापूर्वी सर्वाधिक २८,००० रुग्ण एप्रिलमध्ये आढळले होते. राष्ट्रीय आरोग्य ब्युरोच्या आकडेवारीनुसार महामारी सुरू झाल्यापासून चीनमध्ये रोजचे कोविड रुग्ण विक्रमी पातळीवर आहेत. दरम्यान, चीनी प्रशासनाने झेंगझाऊ आणि त्याच्या आसपासच्या ८ जिल्ह्यांतील ६६ लाख लोकांना लॉकडाऊनमध्ये कैद केले आहे. शटडाऊनचा आदेश शुक्रवारी लागू होईल. आदेशात हेही म्हटले आहे की, जोपर्यंत कोरोना अहवाल निगेटिव्ह येत नाही आणि स्थानिक अधिकाऱ्यांची मंजूरी मिळत नाही तोपर्यंत लोक आपले क्षेत्र सोडू शकणार नाहीत. ते घरातून बाहेरही निघू शकत नाहीत. शटडाऊन असलेल्या क्षेत्रांत आयफोन सिटीचाही समावेश आहे. तिथे एक दिवस आधी आयसोलेशन धोरण आणि खराब स्थितीवरून विरोध झाला होता. कर्मचाऱ्यांनी आंदोलन करण्यासोबतच पोलिसांसोबत वादही घातला होता. विरोधाचे सूर अॅपल कर्मचाऱ्यांशिवाय आसपासच्या इतर कारखान्यांतही पाहायला मिळाले होते. वाढता विरोध पाहून झेंगझाऊच्या अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात चाचण्या करण्याचे आदेश देऊन आयफोन सिटीसह आसपासच्या शहरांत विरोधावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला.

कोरोना रुग्ण वाढत असल्याने चीनला संसर्ग आटोक्यात आणणे अवघड झाले आहे. कारण विषाणूचा प्रसार सहन करायचा की अर्थव्यवस्थेच्या किमतीवर कोरोना पसरण्यापासून रोखण्यासाठी कडक निर्बंध पुन्हा लागू करायचे, हे नेत्यांना ठरवावे लागेल. बिजिंगपासून चोंगकिंग आणि ग्वांगझूपर्यंत प्रमुख शहरांत बऱ्याच अंशी स्थिरता आहे. कारण कोरोना संसर्ग अपार्टमेंट, कार्यालये आणि दुकानांपर्यंत आलेला नाही. शहर पुन्हा चाचण्या वाढवत आहे. रुग्णांची वाढती संख्या रोखण्यासाठी अस्थायी रुग्णालयांची निर्मिती केली जात आहे.

चीनच्या जीडीपीच्या २०% क्षेत्रामध्ये लॉकडाऊन लॉकडाऊनचा चीनच्या व्यापारावर सातत्याने परिणाम होत आहे. िवश्लेषक फर्म नोमुरानुसार, चीनच्या जीपीडीत २०% योगदान देणारे क्षेत्र सध्याही लॉकडाऊन किंवा कडक निर्बंदांचा सामना करत आहे. त्यांच्या केंद्रीय बँकाही पुढच्या वर्षी चीनची वाढ ४.३% ने कमी करून ४% करत आहेत. वाढ घटण्याचे सर्वात मोठे कारण प्रमुख व्यावसायिक हब शंघायमध्ये दोन एप्रिलपासून लागू झालेले दोन महिन्यांचे लॉकडाऊन आहे.

प्रतिक्रिया : फॉक्सकॉनकडून खेद चीनमध्ये आयफोन बनवणारी अॅपलची कंपनी फॉक्सकॉनने गुरुवारी खेद व्यक्त केला. त्यांच्याकडून सांगण्यात आले की, वेतन तांत्रिक बिघाडामुळे पेमेंट होऊ शकले नाही. कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करू.

मागणी : ‘झीरो कोविड’ थांबवावे झिंजियांग, तिबेटच्या क्षेत्रांत काही महिन्यांपासून टाळेबंदी सुरू आहे. झीरो कोविड धोरण थांबवून कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी शांघायसारख्या शहरात लॉकडाऊन करू नये, अशी मागणी अधिकाऱ्यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...