आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेमध्‍ये वॉलमार्ट स्टोअरमध्ये मॅनेजरकडून गोळीबार:7 ठार; हॉलिडे ऑफरची होती गर्दी

रिचमंड7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्हर्जिनियात चेसेपीकमधील वॉलमार्ट स्टोअरमध्ये मंगळवारी रात्री अंदाधुंद गोळीबारात ७ जण ठार झाले, तर ५ जण गंभीर आहेत. २४ नोव्हेंबरच्या थँक्सगिव्हिंग हॉलिडेसाठी ऑफर असल्याने खरेदी करण्यास मोठी गर्दी झाली होती. या वेळी चेंगराचेंगरी झाल्याने लोक पळून गेले.

तीन मिनिटांमध्येच झाडल्या गोळ्या सूत्रांनुसार, आरोपी स्टोअर मॅनेजर कृष्णवर्णीय आंद्रे बिंग आहे. रात्री १०:१२ वाजता त्याने फायरिंग सुरू केली व ३ मिनिटांतच लोकांना मारले. ही घटना गोरे-कृष्णवर्णीय वादाशी जोडली जात आहे. नंतर बिंगने आत्महत्या केली.

बातम्या आणखी आहेत...