आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भूकंप:तुर्कीमध्ये 7 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, पत्त्याच्या घराप्रमाणे कोसळली इमारत; आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू तर 120 पेक्षा जास्त जखमी

अंकाराएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तुर्की आणि ग्रीसमध्ये शुक्रवारी संध्याकाळी भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता 7 रिश्टर स्केलची होती. तुर्कीमध्ये जास्त नुकसान झाल्याची माहिती आहे. तुर्कीत 4 जणांचा मृत्यू झालाय, तर 120 पेक्षा जास्त जखमी झाले आहेत. तसेच, अनेक इमारती जमीनदोस्त झाली आहेत. ग्रीसमध्येही भूकंपाच्या धक्क्यानंतर नागरिकांमध्ये भीती पसरली आहे.

तुर्कीच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितले की, फक्त बाराकली जिल्ह्यात कमीत-कमी 10 इमारती कोसळल्या आहेत. स्थानिक मीडियामध्ये जमीनदोस्त झालेल्या अनेक इमारती दाखवल्या जात आहेत. तुर्कीचे इजमिर राज्य अॅक्टिव फॉल्ट लाइनवर आहे. प्रमुख उत्तर अनातोलियन फॉल्ट लाइनमुळे 1999 मध्येही इस्तांबुलजवळ अतिशय शक्तीशाली भूकंप आला होता. त्यात 17,000 पेक्षा जास्त लोकांचा जीव गेला होता.

सोशल मीडिया यूजरने पोस्ट केलेला व्हिडिओ

वेगवेगळी होती भूकंपाची तीव्रता

तुर्कीच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितले की, भूकंपाचे केंद्र एजियन सागरात 16.5 किलोमीटर खोलीत होते. यूरोपियन-मेडिटेरियन सीसमोलॉजिकल सेंटरने म्हटले की, भूकंपाची तीव्रता 6.9 होती. याचे केंद्र समोसच्या ग्रीक आइसलँडपासून 13 किलोमीटर उत्तर-पूर्वमध्ये होते.