आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायुक्रेनमध्ये बॉम्बहल्ल्यांचे आवाज ऐकू येऊ लागले आहेत. युक्रेनच्या पूर्वेकडील डोनेस्टक व लुहांस्क प्रांतात रशियन समर्थक फुटीरवादी गटांनी युद्धसदृश स्थिती निर्माण केली आहे. या गटांनी युक्रेनच्या जवळपास २४ लष्करी चौक्यांवर हल्लेही केल्याचे वृत्त आहे. हल्ल्यात युक्रेनच्या एका सैनिकाचा मृत्यू झाला. अशा गटांचे वर्चस्व असलेल्या भागातील सुमारे सात लाखांवर लोकांनी पलायनास सुरुवात केली. फुटीरवाद्यांनी सर्व माजी सैनिकांची भरती सुरू केली आहे. म्हणूनच आता रशिया युक्रेनवर कोणत्याही क्षणी हल्ला करू शकतो, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी दिला आहे. यावेळी रशियाचे लक्ष्य युक्रेनची राजधानी किव्ह असेल. बायडेन म्हणाले, रशियाने किव्हमधील २८ लाख निर्दोष लोकांचे प्राण संकटात टाकले आहेत. पुतीन यांनी हल्ल्याचा विचार डोक्यातून काढून टाकावा. अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस म्युनिचमध्ये म्हणाल्या, रशियाच्या हल्ल्याला चोख उत्तर दिले जाईल. त्यातच शनिवारी रशियाने सरहद्दीवर शक्तिप्रदर्शन केले. राष्ट्रपती व्लादीमीर पुतीन यांनी या भागाला भेट देऊन वॉरगेम पाहिले.
रशियाने केली तीन अण्वस्त्रांचे सादरीकरण
युक्रेनच्या सरहद्दीवर आयोजित वॉरगेमला पाहण्यासाठी पुतीन हजर होते. या प्रदर्शनात रशियाने तीन अण्वस्त्रांचेही सादरीकरण केले. त्यापैकी एक हायपरसॉनिक स्पीडचे आहे. ते अमेरिकेच्या बचावात्मक प्रणालीला देखील मात देऊ शकते. उर्वरित दोन हवेतून हवेत मारा करणारे व दुसरे सागरी क्षेत्रात मारक अशा स्वरूपाचे आहेत.
जेलेन्स्की यांनी देश सोडू नये, तख्तपालटाची शक्यता
म्युनिच येथील सुरक्षा परिषदेत सहभागी होण्यासाठी युक्रेनचे राष्ट्रपती जेलेन्स्की यांनी जाऊ नये. देश सोडून जाऊ नये, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन यांनी दिला. रशिया या संधीचा लाभ घेऊन तख्तपालटाचा प्रयत्न करू शकते, असा दावा अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांनी केला. परंतु जेलेन्स्की शनिवारी एकाच दिवसात परदेशातून परततील.
युक्रेनमध्ये एटीएमबाहेर लागल्या रांगा
रशियाचा हल्ला होण्याची भीती लक्षात घेऊन युक्रेनमध्ये एटीएमच्या बाहेर लोकांच्या रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळू लागले आहे. सध्या देशातील सरकारी-खासगी कार्यालये खुली आहेत. परंतु वर्दळ कमी होती आहे. लोकांचा रशियाविषयीचा संताप वाढला आहे. एका लाइव्ह शो दरम्यान पुतीन समर्थक एका नेत्याला पत्रकारांनी बेदम मारहाण केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.