आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इम्रान यांचे 7 व्हिडिओ होणार लीक:यातील 3 त्यांच्या घरातच तयार करण्यात आले, जारी होण्यापूर्वी झाली न्यायवैद्यक तपासणी

इस्लामाबाद19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे कथित 7 वादग्रस्त व्हिडिओ लवकरच लीक होणार आहेत. यातील 3 अत्यंत आक्षेपार्ह असून, त्यांचे वर्णन शब्दांतही करता येणार नाही. त्यामुळे इम्रान यांच्या पाकिस्तान तहरिक ए इंसाफ पक्षाकडून (पीटीआय) हे व्हिडिओ उजेडात येण्यापूर्वीच त्यावर पडदा टाकण्याचे काम सुरू झाले आहे. विशेष म्हणजे इम्रान यांनी गुरुवारीच एका मुलाखतीत ईदच्या सुट्टीनंतर आपल्या चारित्र्य हननाचे प्रयत्न होऊ शकतात असे मत व्यक्त केले होते. आपले काही व्हिडिओ असल्याचेही त्यांनी यावेळी कबूल केले होते.

रमजान संपण्याची होती प्रतीक्षा

पाकच्या अनेक पत्रकारांनीही इम्रान यांचे काही अत्यंत आक्षेपार्ह व्हिडिओ कोणत्याही वेळी उजेडात येण्याचा दावा केला आहे. ज्येष्ठ पत्रकार जफर अब्बास नकवी म्हणाले -हे व्हिडिओ लीक होण्यासाठी तयार आहेत. स्वतः इम्रान यांनाही याची कल्पना आहे. यामुळेच त्यांच्या पक्षाच्या सोशल मीडिया विभागाने आतापासूनच डॅमेज कंट्रोल मोहीम सुरू केली आहे. नकवी म्हणाले -विश्वासू सूत्रांनी इम्रान यांचे 7-8 वादग्रस्त व्हिडिओ आहेत. याशिवाय 2 ध्वनिफितीही आहेत. हे ध्वनि व चित्रफिती इम्रान सरकार कोसळल्यानंतर लगेचच जारी केले जाणार होते. पण, त्यावेळी रमजानचा महिना सुरू झाला होता. त्यामुळे ते थांबवण्यात आले. आता ते कोणत्याही वेळी जारी केले जाऊ शकतात.

स्थानिक माध्यमांच्या वृत्तांनुार, इम्रान यांचे 3 व्हिडिओ त्यांच्या घरातच तयार करण्यात आलेत.
स्थानिक माध्यमांच्या वृत्तांनुार, इम्रान यांचे 3 व्हिडिओ त्यांच्या घरातच तयार करण्यात आलेत.

न्यायवैद्यक तपासणीही केली गेली

बिझनेस रेकॉर्डरचे माजी पत्रकार रिझवान रझी यांच्या माहितीनुसार, इम्रान यांचे काही व्हिडिओ त्यांच्या बनीगाला निवासस्थानी चित्रित करण्यात आलेत. सर्वात मोठा व्हिडिओ 2 मिनिट 18 सेकंदांचा आहे. विशेष बाब म्हणजे इम्रान व त्यांच्या पक्षाने हे व्हिडिओ बोगस असल्याचा दावा करु नये यासाठी ते जारी करण्यापूर्वी त्यांची न्यायवैद्यक तपासणीही केली गेली आहे.

नकवी या व्हिडिओविषयी म्हणतात -या व्हिडिओमुळे पाकिस्तानात खळबळ माजणार असल्याचे इम्रान व त्यांच्या पक्षाला ठावूक आहे. एका व्हिडिओचे तर शब्दांतही वर्णन करता येत नाही. काही ऑडिओ टेप्सही उजेडात येऊ शकतात. यातील एक ध्वनिफित कथितपणए इम्रान सरकारमधील गृहमंत्री शेख रशीद यांनी कारमध्ये रेकॉर्ड केली होती. नंतर त्यांनी ती लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांना पाठविली होती. ​​​​​​​

शख रशीद यांच्यासोबत इम्रान खान. रशीद यांनीच इम्रान यांचा कॉलरेकॉर्ड केल्याचा आरोप आहे.
शख रशीद यांच्यासोबत इम्रान खान. रशीद यांनीच इम्रान यांचा कॉलरेकॉर्ड केल्याचा आरोप आहे.

3 व्हिडिओ बनीगालात तयार झाले

इम्रान खान इस्लामाबादपासून 15 किमी अंतरावर असणाऱ्या बनीगालात राहतात. ते येथून पंतप्रधान कार्यालयापर्यंतचा प्रवास हेलिकॉप्टरने करत होते. इम्रान यांच्या बनीगाला शेकडो एकरांवर पसरला असून, त्यात पंचतारांकित हॉटेलात उपलब्ध असणाऱ्या सर्वच सुविधा उपलब्ध आहेत. एवढेच नाही तर गोल्फ कोर्सपासून स्विमिंग पुलासारख्या विविध सुविधाही येथे उपलब्ध आहेत.

यासंबंधीच्या वृत्तानुसार, इम्रान यांचे 3 कथित वादग्रस्त व्हिडिओ बनीगालात तयार झालेत. यातील एक इम्रान सरकार कोसळणार होते, त्यावेळचा आहे.

टिकटॉक स्टार हरीम शाह यांच्यासोबत इम्रान. हरीम गत महिन्यात अचानक लंडनला निघून गेली.
टिकटॉक स्टार हरीम शाह यांच्यासोबत इम्रान. हरीम गत महिन्यात अचानक लंडनला निघून गेली.

लंडनला कुणी, कुणाला व का पाठवले?

ज्येष्ठ पत्रकार इम्रान शफाकत यांनी या प्रकरणी इम्रान यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. ते म्हणाले -इम्रान व त्यांच्या पीटीआय पक्षाने एका महिलेला काही महिन्यांपूर्वी अचानक चार्टर प्लेनने मध्यरात्री लंडनला का पाठवले? या महिलेचा संबंध पीटीआयच्या अनेक मंत्र्यांशी असल्याचा आरोप आहे. ही महिला गरोदर होती व तिचा लंडनमध्ये गर्भपात करण्यात आला, असाही आरोप आहे.

इम्रान सरकारच्या काळात टिकटॉक स्टार हरीम शाह हिचे नाव चांगलेच चर्चेत आले होते. इम्रान यांच्यासह त्यांचे गृहमंत्री शेख रशीद व अनेक नेत्यांसोबत या महिलेचे फोटो व व्हिडिओ आहेत. काही दिवसांपूर्वी हरीम लाखो पाउंडच्या नोटांच्या बंडलांसह व्हिडिओ तयार करताना दिसून आली होती. तेव्हा इम्रान सत्तेत होते.

बातम्या आणखी आहेत...