आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणांचे आंदोलन सुरूच:नागरिकांवर निगराणी करण्यासाठी संरक्षणाच्या तरतुदीतून 7 टक्के जास्त नागरी सुरक्षेवर खर्च

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चीन कोविडवर नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरत आहे. चीनचे जनिपिंग सरकार तीन वर्षांपासून झीरो कोविड धोरणावर काम करत आहे. मात्र, चीन प्रत्येक आघाडीवर मार खात आहे. राष्ट्राध्यक्ष जनिपिंग यांनी अलीकडे देशाचे नेतृत्व पुन्हा एकदा स्वीकारल्यानंतर त्यांच्याविरुद्ध संतापाची लाट उसळली आहे. चीनमध्ये हुकूमशाही शासन आणि कठोर निर्बंधाविरुद्ध युवा रस्त्यावर आंदोलन करत आहेत. परिणामी सरकारविरोधी वातावरण नियंत्रणात आणण्यासाठी चीन आपल्या नागरिकांविरुद्ध दडपशाहीही करत आहे.

आंदोलनात सहभागी लोकांचे मोबाइलमध्ये छायाचित्र आणि मेसेज तपासून धरपकड केली जात आहे. शांततापूर्ण आंदोलन काढल्यावरही अटक केली जात आहे. चीन आपल्याच नागरिकांच्या निगराणीची प्रणाली बळकट करण्याठी नागरी सुरक्षेवर संरक्षण बजेटपेक्षा जास्त खर्च करत आहे. चीनच्या सार्वजनिक सुरक्षेचे बजेट १७ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. हे पोलिसा, गुप्तचर तंत्र, तुरुंग, न्यायालयासह लष्करी बजेटवर होणाऱ्या एकूण खर्चापेक्षा ७% जास्त आहे.

चीनची लोकसंख्या सुमारे १४० कोटी आहे. याच पद्धतीने चीन सुमारे १००० रु.प्रति वर्ष आपल्या नागरिकांच्या निगराणीवर खर्च करत आहे. १० वर्षांनंतर चीनच्या बदलत्या धोरणाने स्पष्ट झाले की, चीन आणखी कठोर पाऊल उचलू शकते.

कोविड तपासणीचा लोकांना त्रास, निर्बंध नकोत बीजिंगच्या झांग म्हणाल्या, पीसीआर चाचणीचा कंटाळा आला आहे. एक तरुण मजूर म्हणाला, गेल्या सप्टेंबरमध्ये संसर्ग झाल्याचे सांगून त्यांच्यावर निर्बंध टाकले. मात्र,त्यांना कोणतेही लक्षण नव्हते. आता कोणतेही निर्बध नकोत.

बातम्या आणखी आहेत...