आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
ब्रिटनमध्ये लसीकरण सुरू झाले आहे मात्र कोरोनाचा कहर थांबण्याचे नाव घेत नाहीये. या पार्श्वभूमीवर बोरिस जॉनसन सरकारने मार्चपर्यंत देशभर कडक लॉकडाउनचे निर्देश दिले आहेत. हा लॉकडाउन 7 आठवड्यांचा राहणार आहे. कोरोनामुळे होणाऱ्या मृतांचा आकडा एक लाखापर्यंत पोहोचू नये यासाठी यूके सरकार प्रयत्न करीत असल्याचे सांगण्यात येत आहे. ब्रिटनमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत 75 हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. 22 फेब्रुवारीपर्यंत या निर्बंधांमध्ये दिलासा मिळण्याची अपेक्षा नाही. त्याचबरोबर सरकारने फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत शाळा बंद ठेवण्याचीही घोषणा केली आहे. लोकांनी घरीच रहावे, दिवसातून एकदाच व्यायाम करा, असे आवाहन देखील केले आहे. 4 जानेवारीच्या रात्रीपासून अनावश्यक दुकानेही बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
न्यूयॉर्कमध्ये नवीन स्ट्रेनचा पहिला रुग्ण आढळला
यादरम्यान न्यूयॉर्कमध्ये 4 जानेवारी रोजी कोरोनाच्या नवीन स्ट्रेनचा पहिला रुग्ण आढळला. गव्हर्नर अँड्र्यू कुओमो यांनी याची पुष्टी केली आहे. यापूर्वी, कोलोरॅडो आणि कॅलिफोर्नियामध्ये नवीन स्ट्रेनची प्रकरणे समोर आली होती.
जगभरात 8.6 कोटींपेक्षा जास्त रुग्ण
जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या 8 कोटी 61 लाख 2 हजार 71 झाली आहे. तर 18 लाख 60 हजार 427 जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे 6 कोटी 10 लाख 54 हजार 379 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.