आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • 70% Of Teachers Strike In US, Warning To Close Schools; Allegations Of Lack Of Systems To Control The Virus In Schools

कोरोना संकट:अमेरिकेत 70 टक्के शिक्षकांचा संप, शाळा बंद ठेवण्याचा इशारा; शाळांमध्ये विषाणूला राेखण्यासाठी व्यवस्थेचा अभाव असल्याचा आरोप

डाना गाेल्डस्टीन / एलिजा शापिराे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र अमेरिकेच्या साॅल्ट लेक सिटीचे आहे. येथेही पालकांनी निदर्शने केली
  • सर्व्हे: 60 टक्के पालकांचा शिक्षकांना पाठिंबा, ऑनलाइन शिक्षण यशस्वी नाही

अमेरिकेतील शिक्षक संघटनांनी काेराेनादरम्यान शाळा बंद करण्याचा इशारा दिला आहे. या संघटनांना ७० टक्के शिक्षकांचा पाठिंबा आहे. राष्ट्राध्यक्ष डाेनाल्ड ट्रम्प शाळा सुरू ठेवण्यावर भर देत असतानाच शिक्षकांनी हा इशारा दिला. अमेरिकन फेडरेशन ऑफ टीचर्सचे अध्यक्ष रँडी वेनगार्टन म्हणाले, शाळांमध्ये काेराेनाला प्रतिबंध करण्यासाठी व्यवस्था नाही. बहुतांश खाेल्यांत पुरेशी हवा नसते. मास्कही कमी पडू लागले आहेत. राजकीय नेत्यांनी स्वत:च्या सुरक्षेची पुरेशा व्यवस्था केली. परंतु, शिक्षकांना त्यांच्या नशिबावर साेडले आहे. वास्तविक मुलांचे ऑनलाइन शिक्षण मर्यादित असले पाहिजे. संघटनेने शाळा सुरू करण्याच्या आदेशाविराेधात फ्लाेरिडाचे गव्हर्नर राॅन डिसँटिस यांच्यावर खटला दाखल केला आहे. या संपूर्ण प्रकरणात लहान मुलांचा माेहरा म्हणून वापर केला जात आहे, असा आराेप लाेकशिक्षण संबंधी केंद्राचे प्रमुख राॅबिन लेक यांनी केला. दीर्घकाळ अभ्यास न केल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान हाेणार आहे. अमेरिकेत काेराेनाचे आतापर्यंत ४५ लाख ६८ हजार ३७५ रुग्ण आढळून आले, तर १ लाख ५३ हजार ८४८ जण मृत्युमुखी पडले.

सर्व्हे: ६० टक्के पालकांचा शिक्षकांना पाठिंबा, आॅनलाइन शिक्षण यशस्वी नाही

एका पाहणीत ६० टक्के पालकांनी शिक्षकांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवला. शाळा तूर्त सुरू केल्या जाऊ नयेत, असे पालकांचेही म्हणणे आहे. ऑनलाइन शिक्षण यशस्वी राहिले नाही. कार्यालयीन कामे व मुलांचे शिक्षण यांच्यात ताळमेळ ठेवणे शक्य झाले नाही. काेराेनामुळे अनेक पालकांवर राेजगाराचे संकट आहे. अशा स्थितीत मुलांच्या शालेय शुल्काची व्यवस्था करण्यात त्यांना अपयश आले आहे. शाळांतह काेराेनाच्या प्रतिबंधाची ठाेस व्यवस्था नाही. म्हणूनच मुलांना शाळेत कसे पाठवता येईल, असा प्रश्न पालकांनी विचारला आहे.