आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लंडन:सोशल मीडियाबाबत 73 टक्के मते नकारात्मक, कारण ठरले सातत्याने येणारे नोटिफिकेशन्स

लंडनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • नवी पिढी मानसिक समस्यांनी त्रस्त

सनायत लारा अमेरिकेच्या लाॅस एंजलिसमधील व्हिडिआे प्राेड्युसर आहेत. वय केवळ २८ वर्षांचे. लाेकांशी त्या अगदी सहजपणे चर्चा करू शकतात. परंतु फाेन, साेशल मीडिया किंवा इतर प्लॅटफाॅर्म्सवरील संदेशांना उत्तर देताना मात्र त्यांना आेढूनताणून बाेलावे लागते. त्यावरून त्यांचे मित्र तक्रारही करतात. त्यानंतर त्यांनी स्वत:च्या वर्तनाबद्दल तज्ज्ञांशी चर्चा केली. असे संदेश किंवा संवादाबद्दल केवळ विचार करण्यातच त्या व्यग्र हाेतात, असे तज्ज्ञांकडून समजले. अशा प्रकारचा त्रास, उद्वेग अनुभवणाऱ्या एकट्या नाहीत. गेल्या वर्षी झालेल्या एका अभ्यासादरम्यान सुमारे ७३ टक्के युजरने साेशल मीडियाबद्दल नकारात्मक विचार व्यक्त केले हाेते.

बहुतांश तरुणांमध्ये साेशल मीडिया व टेक्स्ट मेसेजिंगबद्दलची व्यग्रता वाढली आहे. त्यामागे साेशल मीडिया, मेसेजिंग अॅप इत्यादीवर सातत्याने येणारे नाेटिफिकेशन. अनेक लाेक त्याकडे दुर्लक्षही करत असतात. अशा प्रकारची समस्या ‘मिलेनियल जनरेशन’(सन १९८० व ९० च्या दशकात जन्मलेले) यांच्यात दिसून येते. ही आता मानसिक समस्या देखील मानली जात आहे. २०१९ नंतर काेराेनाच्या काळामुळे ही परिस्थिती आणखी बिघडली आहे. या दरम्यान आॅनलाइन घडामाेडीत सुमारे ६१ टक्के वाढ दिसून आली आहे. परिणामी अमेरिकेत प्रत्येक युजर आता फाेनवर सरासरी ४७ संदेशांकडे दुर्लक्ष करताे. १ हजार ६०२ ई-मेल सुरू करणे, वाचतही नाहीत.

संरक्षणाचा एकच मार्ग, मर्यादा निश्चित करावी लागेल : न्यूयाॅर्क विद्यापीठात मानसशास्त्राच्या प्राेफेसर एमिली बॅल्सटिस म्हणाल्या, बचावाचा एकच मार्ग आहे. हा मार्ग म्हणजे मर्यादा निश्चित केली पाहिजे. उदाहरणार्थ- झाेपण्यापूर्वी फाेनला दुसऱ्या खाेलीत ठेवून दिले पाहिजे. फाेनचा अलार्मसारखा वापर करत असाल तर सरळ अलार्म घड्याळीचाच वापर करा. त्यामुळे रात्री झाेपण्यापूर्वी आणि सकाळी उठताना आपण फाेनपासून दूर राहू शकताे. या साध्या उपायातून देखील खूप मदत हाेऊ शकेल.

बातम्या आणखी आहेत...