आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हॅकेशन वंडर:77 % लोकांना वाटते की नात्यांत गोडवा परतला, 81% जणांनी कुटुंबाला जवळून समजून घेतले

वॉशिंग्टनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

व्हॅकेशनवर जाण्याची मजा औरच असते. प्रत्येकाला व्हॅकेशनवर जायची इच्छा असते. व्हॅकेशनवर जाण्याचे फायदे समजून घेण्यासाठी अमेरिकेत पहिल्यांदच वन पोलने सर्वेक्षण केले. त्यातून अनेक आश्चर्यकारक तथ्ये समोर आली आहेत.

जोडीदारासोबत पटत नसेल तर त्याच्यासोबत व्हॅकेशनवर जावे. ७७% लोकांना वाटते की यामुळे जोडीदाराचे हरवलेले प्रेम पुन्हा मिळेल, नात्यांत सुधारणा होईल. जवळपास दोन हजार लोकांवर झालेल्या सर्वेक्षणात ४२% लोकांनी सांगितले, की व्हॅकेशनमुळे त्यांचे जोडीदारावर पुन्हा प्रेम जडले. सर्वेक्षणात सहभागी एक तृतीयांश लोकांना वाटते, की नात्यात जिवंतपणा कायम ठेवण्यासाठी व्हॅकेशन हा चांगला पर्याय आहे. जोडीदार किंवा छोट्या समूहासोबत फिरायला जाणे अधिक फायदेशीर वाटते, असे लोकांनी सांगितले. ८१% लोकांना वाटते, की कुटुंबीयांसोबत फिरायला गेल्यास बाँडिंग वाढते. याचप्रमाणे ७९% जणांना वाटते, की नाती घट्ट होतात. व्हॅकेशनवर गेल्यामुळे लोक आपल्या निकटवर्तीयांना चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकतात. आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडण्यासाठीचा वेळ व्हॅकेशनमध्येच मिळतो. ६१% लोक व्हॅकेशनवर एखाद्यासोबत असले तरच काही तरी रोमहर्षक करण्याचा प्रयत्न करतात. १० पैकी ७ जण सांगतात, की व्हॅकेशनवरून परतल्यानंतर त्यांना पूर्वीपेक्षा अधिक स्वत:च्या जवळ असल्याची अनुभूती येते. दर ४ पैकी ३ जणांचे म्हणणे आह.

सोबत फिरल्याने ६५% पर्यंत आधिक आनंद मिळतो सोबत फिरल्यामुळे लोकांना ६५% जास्त आनंद मिळतो. ४५% लोक व्हॅकेशनवर कुटुंबीय आणि ३७% जोडीदारासोबत जातात. त्या क्षणांना संस्मरणीय बनवण्यासाठी दोन तृतीयांश लोक खूप छायाचित्रे काढतात. नंतर ती छायाचित्रे पाहून ते आनंदी होतात.

बातम्या आणखी आहेत...