आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

8 लाख भारतीयांना सोडावे लागू शकते कुवेत:संसदेत परदेशी कामगारांसंबंधित अप्रवासी कोटा विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी, भारतासह अन्य देशातील लोकांची संख्या कमी करण्याचे प्रयत्न सुरू

कुवेत सिटी2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रवासी विधेयकाच्या मसुद्यामध्ये कुवेतमध्ये भारतीयांची संख्या देशाच्या लोकसंख्येत 15 % पेक्षा जास्त असून नये असा नियम आहे
  • खासदार आणि अधिकारी कोरोनाची सुरुवात झाल्यापासून परकीयांची संख्या कमी करण्याची मागणी करत आहेत
  • कुवेतमध्ये10.45 लाख भारतीय लोक राहतात, तर देशातील लोकसंख्या 40.3 लाख आहे, तर इतर देशांतील सुमारे 30 लाख लोक येथे वास्तव्य करतात.

कुवेतमधील संसदेत परदेशी कामगारांशी संबंधित अप्रवासी कोटा विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी देण्यात आली आहे. गल्फ न्यूजनुसार समितीने हे विधेयक घटनात्मक असल्याचे म्हटले आहे. आता ते विधानसभेच्या अन्य समित्यांकडे पाठवले जाईल. हे बिल मंजूर झाल्यानंतर सुमारे 8 लाख भारतीयांना कुवेत सोडावे लागू शकते. विधेयकानुसार कुवेतमधील भारतीयांची संख्या देशातील लोकसंख्येच्या 15% पेक्षा जास्त नसावी. यासाठी व्यापक आराखडा तयार करण्याचेही सांगण्यात आले आहे.

जेव्हापासून महामारीला सुरुवात झाली तेव्हापासून कुवेतमध्ये इतर देशांतील लोकांच्या विरोधात आवाज उठला जात आहे. इथले सरकारी अधिकारी आणि खासदार हे कुवेतमधून परदेशीयांची संख्या कमी करण्याची मागणी करत आहेत. गेल्या महिन्यात कुवेतचे पंतप्रधान शेख शबा-अल-खालिद अल-शाबा यांनी देशात स्थलांतरितांची संख्या 70% वरून 30% पर्यंत कमी करण्याचा प्रस्ताव दिला होता.

सरकारी विभागातून संपवण्यात येणार प्रवाश्यांच्या नोकऱ्या

देशातील खासदारांना सर्व सरकारी विभागातील स्थलांतरितांची नोकऱ्या एका वर्षाच्या आत पूर्ण करण्यास सांगण्यात आले आहे. यावर्षी मे महिन्यात सरकारने पालिकेच्या सर्व नोकऱ्यांमध्ये स्थलांतरितांच्या ऐवजी कुवेतमधील नागरिकांची नेमणूक करण्यास सांगितले. जूनमध्ये, सरकारी तेल कंपनी कुवैत पेट्रोलियम कॉर्पोरेशन (केपीसी) आणि त्याच्या युनिट्सनी 2020-21 पर्यंत सर्व स्थलांतरितांवर बंदी घालण्याची घोषणा केली होती. सध्या येथे इतर देशातील लोकांना नोकरी देण्यास बंदी आहे.

कुवेतमध्ये भारतीयांची संख्या सर्वाधिक 

कुवेतमध्ये भारतीयांची संख्या सर्वाधिक आहेत. कुवेतमध्ये सुमारे 10.45 लाख भारतीय राहतात. त्यापैकी केरळ आणि तामिळनाडूमधील सर्वाधिक आहेत. प्रवासी कामगार येथे तेल आणि बांधकाम कंपन्यांमध्ये काम करतात. देशाची एकूण लोकसंख्या 40.3 लाख आहे. इतर देशांमधून येणार्‍या लोकांची संख्या सुमारे 30 लाख आहे. कुवेतचे नागरिक आणि इतर देशांमधील लोकांच्या संख्येत खूप फरक आहे. हे पाहता, गेल्या वर्षी खासदार सफ-अल हेशम यांनी सरकारला पुढील पाच वर्षांत सुमारे 20 लाख स्थलांतरितांना देशाबाहेर पाठवण्याची विनंती केली. ते म्हणाले की, देशातील कुवैत्यांची संख्या एकूण लोकसंख्येच्या जवळपास 50% असावी.

बातम्या आणखी आहेत...