आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • International
 • 8 Times Less Delta Variant Deaths Than The Old; The Findings Of The Largest Study On The Delta In Britain Have Raised Hopes; News And Live Updates

डेल्टा व्हेरिएंट:जुन्यापेक्षा 8 पट कमी डेल्टा व्हेरिएंटचे मृत्यू; ब्रिटनमध्ये डेल्टावर सर्वात मोठ्या अभ्यासाच्या निष्कर्षांनी जागवली आशा

लंडन/नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक
 • ब्रिटनमध्ये फक्त 3 महिन्यांत 2.71 लाख नमुन्यांचे जीनोम सिक्वेन्सिंग केले गेले

जगभरात संसर्गाची नवी लाट आणणारा कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट (स्वरूप) जुना व्हेरिएंट अल्फाच्या तुलनेत ८ पटींनी कमी घातक आहे. तो फक्त पसरतो वेगाने, मात्र त्यामुळे संसर्ग होणाऱ्या रुग्णांचा मृत्युदर फक्त ०.२५% इतकाच आहे. अल्फा व्हेरिएंटचा संसर्ग झालेल्या रुग्णांचा मृत्युदर १.९०% आहे. म्हणजे डेल्टामुळे १० लाखांमागे २४८ तर, अल्फाने १० लाखांमागे १,९०२ मृत्यू झाले आहेत. ब्रिटनच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ताज्या अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे.

ब्रिटनमध्ये २.७१ लाख कोरोना रुग्णांच्या नमुन्यांचे जीनोम सिक्वेन्सिंग करण्यात आली. ती १५ जुलैच्या आधीपर्यंत गोळा केलेल्या ३ महिन्यांच्या आकडेवारीवर आधारित आहे. हा आजवरचा सर्वात विस्तृत व महत्त्वाचा अभ्यास असल्याचे जगभरातील महामारीतज्ज्ञांचे मत आहे. कारण, अमेरिका व युरोपीय देशांत आता रोज आढळणारे ९५% पेक्षा जास्त रुग्ण डेल्टा व्हेरिएंटचे आहेत. यामुळे डेल्टाचा संसर्ग होणाऱ्यांची संख्या जास्त असली तरी त्यात मृत्यूचे प्रमाण कमी असेल अशी अाशा आहे. विशेष म्हणजे ब्रिटनमध्ये आजवर गॅमा व्हेरिएंटमुळे एकाचाही मृत्यू झालेला नाही.

अल्फाचा जितका मृत्युदर ५० पेक्षा कमी वयात, तितका डेल्टापेक्षा ५० वर्षांवरील लोकांत
ब्रिटनमध्ये दररोज सरासरी ३५ हजारांवर नवे रुग्ण आढळत आहेत. पैकी ९५% पेक्षा जास्त डेल्टाचे आहेत. दुसरीकडे, राेजच्या मृत्यूची सरासरी ३० पेक्षा कमी कायम आहे.

गॅमा वगळता ब्रिटनमध्ये आजवरच्या सर्व व्हेरिएंटपेक्षा कमी घातक आहे डेल्टा

 • व्हेरिएंट रुग्ण मृत्यू
 • अल्फा 2,24,131 4,264 (1.90%)
 • बीटा 898 13 (1.45%)
 • डेल्टा 45,136 112 (0.25%)
 • एटा 443 12 (2.71%)
 • गॅमा 186 0 (0%)
 • कापा 446 1 (0.22%)

भारतात आजवर फक्त ४२,८६९ नमुन्यांचेच सिक्वेन्सिंग झाले, त्यापैकी ४७.५% ‘व्हेरिएंट आॅफ कन्सर्न’ आढळले
भारतात नवा व्हेरिएंट शोधण्यासाठी जीनोम सिक्वेन्सिंगचा वेग मंद आहे. देशात १५ महिन्यांत फक्त ४२,८६९ नमुन्यांचे सिक्वेन्सिंग झाले. ब्रिटनमध्ये फक्त गेल्या ३ महिन्यांतच २.७१ लाख नमुन्यांचे सिक्वेन्सिंग झाले. तेथील एकूण रुग्णांच्या तुलनेत १९% नमुन्यांचे सिक्वेन्सिंग होत आहे. भारतात हे प्रमाण केवळ ०.१४ टक्के इतकेच आहे.

 • डेल्टा 15,236 35.5%
 • अल्फा 3,974 9.3%
 • कापा 1,024 2.4%
 • बीटा 149 0.3%
 • इतर 22,886 52.5%

भारतात तिसऱ्या लाटेत; पर्यटन व धार्मिक स्थळे बंदच ठेवली जावी - आयएमए
इंडियन मेडिकल असोसिएशनने म्हटले आहे की, महामारीचा इतिहास बघता कोरोनाची तिसरी लाट अटळ आहे. भारतात तिसरी लाट दृष्टिक्षेपात आहे. देशात पर्यटन आवश्यक आहे, मात्र त्यासाठी वाट पाहिली जाऊ शकते. सरकारने धार्मिक स्थळे आणि पर्यटनस्थळे सध्या बंदच ठेवली पाहिजेत. भारतात कोणत्या व्हेरिएंटमुळे रुग्णांचा मृत्युदर कमी आहे व कोणत्यामुळे जास्त हे समोर आलेले नाही.

यामुळे दिलासा...
भारतात कोरोनाचे ८८% रुग्ण डेल्टा व्हेरिएंटचेच आढळत अाहेत. युरोपियन तसेच अमेरिकी देशांत ९५% वर रुग्ण डेल्टाचे आहेत; ब्रिटनचा हा अभ्यास सांगतो की डेल्टा फक्त पसरतो वेगाने, मात्र त्याचा मृत्युदर फक्त ०.२५% अाहे, याउलट अल्फाचा मृत्युदर १.९०% आहे.

बातम्या आणखी आहेत...