आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिकेतील बलाढ्य चेहरे:शक्तिशाली पदांवर तैनात 922 लोकांपैकी 80 टक्के गोरे, 20 टक्के कृष्णवर्णीय, आशियाई

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 180 कृष्णवर्णीयांत हिस्पॅनिक, आशियाई, स्थलांतरित समुदायातील व्यक्तींचा समावेश

अमेरिका एक शक्तिशाली राष्ट्र आहे. येथे गोरे, कृष्णवर्णीयांसह अनेक देशांतील लोक राहतात. परंतु गेल्या काही काळापासून येथे कृष्णवर्णीय तसेच आशियाई लोकांवर होणारे हल्ले व वंशभेदी टीकेला सामोरे जावे लागत आहे. काही कृष्णवर्णीयांची हत्या झाली. निवडणुकीच्या तोंडावर हा मुद्दा समोर येत आहे. त्याबाबत न्यूयॉर्क टाइम्सने एक पाहणी केली. त्यानुसार काही गोष्टी स्पष्ट दिसून आल्या. महत्त्वाच्या व शक्तिशाली पदांवर ९२२ लोक आहेत. १८० लोक कृष्णवर्णीय, हिस्पॅनिक आणि आशियाई वंशाचे आहेत. म्हणजेच पदांवर िनयुक्त ८० टक्के गोरे व केवळ २० टक्के कृष्णवर्णीय व्यक्तींचा समावेश आहे. अमेरिकेत कायदा पारित करणाऱ्या लोकांत यांचा समावेश होतो. त्यात हॉलीवूड स्टुडिआेचेही मालक,विद्यापीठांचेही नेतृत्व करतात. काही प्राे स्पाेर्ट््स संघाचे मालकही या पदांवर आहेत. काही मोठ्या कंपन्यांचे मालक आहेत. काही मूठभरांच्या हाती अर्थव्यवस्थेसंबंधी अधिकार आहेत.

सिनेट : कायदा करणारे १०० लोक , पैकी ९ आशियाई, हिस्पॅनिक
अमेरिकेत सिनेटमध्ये १०० लोक कायदानिर्मितीत आहेत. पैकी केवळ ९ लोक आशियाई, कृष्णवर्णीय, हिस्पॅनिक आहेत. अमेरिकी सिनेटच्या इतिहासात फक्त २९ सिनेटर कृष्णवर्णीय झाले. पहिल्यांदा टिम स्कॉट सदस्य झाले. ते आफ्रिकी-अमेरिकी वंशाचे होते.

क्रीडा : ९९ बेसबॉल, फुटबॉल संघाचे मालक, कृष्णवर्णीय फक्त ६
९९ लोक बेसबॉल टीम, बास्केटबॉल संघ व फुटबॉल संघाचे मालक आहेत. त्यापैकी ६ आशियाई व कृष्णवर्णीय संघांचे मालक आहेत. देशातील तीन सर्वात मोठ्या लीगचे मालकही श्वेत समुदायातील आहेत. हे खेळाडू एनएफएल व एनबीएसाठी खेळतात.

सरकार, अर्थव्यवस्था : ३ कृष्णवर्णीय
ट्रम्प प्रशासनाचे नेतृत्व २४ लोक करतात. त्यात फक्त ३ कृष्णवर्णीय व आशियाई वंशाचे आहेत. हे लोक सरकार व अर्थव्यवस्थेशी संबंधित निर्णय घेतात. अमेरिकेच्या न्यायव्यवस्थेतही हेच हाल दिसतात. सुप्रीम कोर्टात ९ न्यायाधीशांपैकी दोन कृष्णवर्णीय आहेत.

पाेलिस दल : २५ पैकी १४ कृष्णवर्णीय, एक लष्करी पदावर
पाेलिस दलातील प्रमुख पदांवर २५ लोक नियुक्त आहेत. त्यापैकी १४ कृष्णवर्णीय आहेत. त्याशिवाय ८ पुरुष लष्करात प्रमुख पदाची सूत्रे सांभाळतात. त्यात एक कृष्णवर्णीय आहे. पोलिस दल व लष्कराच्या प्रमुख पदांवर गोऱ्यांच्या नियुक्तीवर प्रश्न उपस्थित झालाय.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser