आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानॉर्वेच्या राजधानीपासून १७५ किमी अंतरावर देवदार आणि ओकच्या झाडांनी वेढलेल्या महामार्गावरील एक स्वच्छ इंधन स्टेशन ईव्हीचे वर्चस्व असलेल्या भविष्याची झलक देते. चार्जिंग स्टेशनची संख्या पेट्रोल पंपांपेक्षा जास्त आहे. गेल्या वर्षी नॉर्वेमध्ये विकल्या गेलेल्या ८०% नवीन कार ईव्ही होत्या. या ईव्ही क्रांतीसह २०२५ पर्यंत पारंपरिक इंधनावर चालणाऱ्या कारची विक्री संपवण्याचे देशाने लक्ष्य ठेवले आहे. ओस्लोची हवा तुलनेने स्वच्छ आहे. गोंगाट करणारी पेट्रोल-डिझेल वाहने हटवली आहेत. २००९ पासून हरितगृह वायू उत्सर्जनात ३०% घट झाली आहे. विशेष म्हणजे इंधन केंद्राचे कर्मचारी बेरोजगार झाले नाहीत किंवा पॉवरग्रीडही निकामी झाला नाही. ज्याची टीकाकारांना चिंता होती. नॉर्वेजियन ईव्ही असोसिएशनच्या प्रमुख क्रिस्टिना बू म्हणतात, “काही राजकारणी आणि कॉर्पोरेट दिग्गजांचा असा विश्वास होता की, हवामान बदलाविरुद्धच्या लढ्यात मोठा त्याग केला जाईल; परंतु ईव्हीच्या बाबतीत असे नाही. खरं तर, लोकांनी हा बदल स्वीकारला आहे.’ नॉर्वेने १९९०च्या दशकात ईव्हीला प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली. त्यांना कर आणि टोलमधून सूट देण्यात आली होती. फास्ट चार्जिंग स्टेशनसाठी सबसिडीही देण्यात आली.
ओस्लोमधील हवेच्या गुणवत्तेचे मुख्य अभियंता टोबियास वुल्फ म्हणतात, “ईव्हीच्या वाढीमुळे नायट्रोजन ऑक्साइड आणि कारमधून उत्सर्जित होणाऱ्या हानिकारक कणांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. हे कण दमा आणि इतर आजारांचे कारण आहेत. ओस्लोचे उपमहापौर सिरीन स्टॅव्ह म्हणतात, ‘उत्सर्जन कमी करणे हे उद्दिष्ट आहे, त्यामुळे ईव्ही महत्त्वाच्या आहेत. या वर्षाच्या अखेरीस शहर बसेस इलेक्ट्रिक होतील. तथापि, अपार्टमेंट रहिवाशांना चार्जिंग प्लग शोधण्यात समस्या आहे. स्टॅव्ह म्हणतात, ‘आम्ही आणखी सार्वजनिक चार्जर बसवून समस्या दूर करण्यासाठी काम करत आहोत. दुसरीकडे, प्रमुख वीजपुरवठादार एल्व्हियाच्या एमडी, एनी नेसेथर म्हणतात, ‘काही ठिकाणी नवीन सबस्टेशन आणि ट्रान्स्फॉर्मर बसवावे लागतील.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.