आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रचार मोहीम:अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीत 80 हजार कोटी रु. खर्चाचा अंदाज

अमेरिकाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

१९५२ मध्ये ड्वाइट आयसेनहॉवर हे अमेरिकेत जाहिरात मोहीम चालवणारे पहिले राजकारणी होते. अध्यक्षीय निवडणुकीतील त्यांचे विरोधक अॅडलाई स्टीव्हन्सन या धोरणाच्या विरोधात होते. ते म्हणाले, “नाष्ट्याच्या पदार्थांप्रमाणे उच्च पदावरील उमेदवारांची खरेदी-विक्री हा लोकशाही प्रक्रियेचा अनादर आहे.” मात्र, शेवटी स्टीव्हन्सन यांना आयसेनहॉवरकडून दोनदा पराभव पत्करावा लागला. उमेदवारांचे मार्केटिंग आणि राजकीय जाहिराती हा आज एक मोठा व्यवसाय झाला आहे. यंदाच्या अमेरिकन संसदेच्या मध्यावधी निवडणुकीसाठी विक्रमी खर्च येईल. अॅड इम्पॅक्ट रिसर्च फर्मच्या अंदाजानुसार, या निवडणुकांमध्ये ८०,००० कोटी रुपयांहून अधिक खर्च होऊ शकतो. २०१८ च्या तुलनेत ही वाढ १४४% आहे.

८ नोव्हेंबरला होणाऱ्या निवडणुकीच्या खर्चात वाढ का होत आहे? वेस्लेयन मीडिया प्रोजेक्ट या राजकीय जाहिरातींवर लक्ष ठेवणाऱ्या एजन्सीचे संचालक एरिक फ्रँकलिन फॉलर म्हणतात, प्रत्येक निवडणूक महत्त्वाची असते. अॅड इम्पॅक्टनुसार, २०१८ च्या तुलनेत सिनेट आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह मोहिमांवर अनुक्रमे १३६% आणि ६०% जास्त खर्च येईल. राज्यपालपदाच्या निवडणुकीसाठी दुप्पट खर्च होत आहे.

ग्रुप एम जाहिरात कंपनी म्हणते, यावर्षी अमेरिकन मीडिया कंपन्यांच्या कमाईत राजकीय जाहिरातींचा वाटा ४% असेल. हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या चार प्राथमिक निवडणुका आतापर्यंतच्या सर्वात महागड्या ठरल्या आहेत. पक्ष प्राथमिक पद्धतीने उमेदवार ठरवतो. राज्याचे रेकॉर्ड सांभाळणाऱ्या आणि निवडणूक निकाल जाहीर करणाऱ्या राज्य सचिव पदासाठी प्रचंड देणग्या जमा झाल्या आहेत. एकेकाळी हे पद अत्यंत किरकोळ मानले जात होते. यावर्षी २०० डॉलरपेक्षा कमी देणगी देणाऱ्यांनी उमेदवारांना ९,००० कोटी रुपयांहून अधिक देणगी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...