आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • 80 year old Hanuman Temple Mandir Demolished In Pakistan Karachi Lyari. Houses Of 20 Hindus Also Demolished

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाकिस्तानात आस्थेवर घाला:कराचीतील 80 वर्षे जुने हनुमान मंदिर तोडले, 20 हिंदूंची घरे देखील केली जमीनदोस्त; स्थानिक प्रशासनची मात्र बिल्डर कृपा

कराची3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो 2012 चा आहे. तेव्हा कराचीत एक मंदिर तोडले होते. त्यातील मूर्ती उघड्यावर आढळली होती. हिंदू समाजाने त्या अस्थायी तंबूत ठेवले.
  • प्राचीन मंदिर कराचीच्या लायरीमध्ये होते, मीडिया रिपोर्ट्नुसार - फाळणीच्या आधी ते बांधले होते
  • येथे एका बिल्डरला कॉलनी बांधायची आहे. मंदिराच्या आसपास 20 हिंदू परिवार राहत होते, त्यांची घरे देखील पाडली आहेत

पाकिस्तानमध्ये स्वातंत्र्यापूर्वी बांधलेले हनुमान मंदिर पाडण्यात आले. या मंदिराच्या आजूबाजूला जवळपास 20 हिंदू कुटुंबे राहत होती. मंदिरासोबत त्यांची घरे देखील जमिनदोस्त करण्यात आली. मंदिरातील मूर्तीही गायब करण्यात आली आहे. याठिकाणी एक बिल्डर कॉलनी उभारत आहे. स्थानिक प्रशासनाने त्याची मदत केल्याचा येथील लोक आरोप करत आहेत. याबाबत आतापर्यंत पाकिस्तान सरकारने कोणतेही अधिकृत निवेदन जाहीर केलेले नाही.

दरम्यान या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे. हिंदू समुदायाचे नेता मोहन लाल म्हणाले की, एवढे सर्व होऊनही बिल्डर आम्हाला हा परिसर सोडण्याची धमकी देत आहे. यावर पोलिस आणि प्रशासन गप्प आहेत.

पाच दिवसांनंतर उघडकीस आली घटना

मंदिराच्या पुजारीचा असा आरोप आहे की सुमारे 6 महिन्यांपूर्वी कराचीच्या सरहद्दीवर एका बिल्डरने लायरीची जमीन खरेदी केली. त्याला येथे कॉलनी उभारायची आहे. या परिसरात 20 हिंदू कुटुंबे देखील राहतात. जवळच एक प्राचीन हनुमान मंदिर आहे. कोरोनामुळे काही महिन्यांपूर्वी मंदिर बंद केले होते. 'द ट्रिब्यून' वृत्तपत्रानुसार सोमवारी रात्री हे मंदिर तोडण्यात आले. शुक्रवारी ही बाब उघडकीस आली.

फक्त दिखाव्यासाठी पोहोचले पोलिस

घटनेची माहिती मिळताच हिंदू परिवार जमा झाले. यादरम्यान पोलिसही तेथे दाखल झाले. पोलिसांनी संपूर्ण परिसर सील केले आहे. मंदिराचे मातीच्या ढिगाऱ्यात रुपांतर झाले होते. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे आयुक्त अब्दुल करीम मेमन म्हणाले. विशेष म्हणजे या भागात राहणारा बलोच समुदाय मंदिर पाडण्याचा विरोध करत आहे. बलोच नेता इरशाद बलोच म्हणाले की, या घटनेमुळे आम्ही अत्यंत दुःखी आहोत. आम्ही लहानपणापासून मंदिर पाहत होतो. ते आमच्या वारसाचे प्रतिक होते.

बिल्डरने फसवणूक केली

स्थानिक नागरिक हिरालाल म्हणाले की, बिल्डरने आमची फसवणूक केली आहे. कॉलनी उभारताना मंदिराला कोणतेही नुकसान पोहचणार नाही असे त्याने आश्वासन दिले होते. मंदिराचे पुजारा हर्सी रडत म्हणाले - आधी आमचे घर उजाड केली. आता मंदिरही पाडले. हनुमानाच्या मूर्ती कुठे आहेत याबाद्दल आम्हाला कोणीही सांगणार नाही.