आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजगातील सर्वाेच्च शिखर एव्हरेस्ट सर करणे प्रत्येक गिर्याराेहकाचे स्वप्न असते. १९५३ नंतर दहा हजार जणांना ही कामगिरी नाेंदवता आली. त्यात केवळ ८ कृष्णवर्णीयांना ते फत्ते करता आले. म्हणूनच अमेरिकेतील विविध शहरांमधील वेगवेगळ्या क्षेत्रातील कृष्णवर्णीय व्यक्तींच्या एका गटाने समुदायासाठी अभिमानास्पद अशी कामगिरी करण्याचा संकल्प केला आहे. या गटात शिक्षक, अभियंता, सैन्य तसेच फाेटाेग्राफर इत्यादी क्षेत्रातील गिर्याराेहकांचा समावेश आहे. फुल सर्कल असे या गटाचे नाव आहे. म्हणजेच इतिहासातील एक अध्याय आता पूर्ण झाला आहे, असा संदेश कृष्णवर्णीय गट जगाला देऊ इच्छिताे.
एव्हरेस्टची चढाई करणारे बहुतांश गिर्याराेहक सामान्यपणे श्वेतवर्णीय राहिले आहेत. कृष्णवर्णीयदेखील काेणत्याही गाेष्टीत मागे नाहीत. त्यांनी निर्धार केल्यास प्रत्येक अडथळा दूर हाेऊ शकताे, असे जगाला ठणकावून सांगण्याची संधी यानिमित्ताने मिळणार आहे, अशी या गटाची भूमिका आहे. गटाचे कॅप्टन ५८ वर्षीय फिलीप हँडर्सन म्हणाले, सर्व सदस्यांनी प्रशिक्षणासाठी निधी संकलन केले आहे. क्राउड फंडिंगद्वारे १.१२ काेटी रुपयांची उभारणी केली. या निधीद्वारे गटातील सर्व सदस्य अमेरिकेतच गिर्याराेहणासाठी आवश्यक असे प्रशिक्षण घेत आहेत. गटाचे ९ सदस्य याच वर्षी एप्रिलमध्ये एव्हरेस्टची चढाई सुरू करतील. कृष्णवर्णीयही शिखर गाठू शकतात, असे आम्हाला जगाला ठासून सांगायचे आहे. या गटाला गिर्याराेहणासाठी अनेक कंपन्यांकडून प्रायाेजकत्वाची आॅफरही आली आहे.
उद्दिष्ट एकच - आम्ही कुणापेक्षाही कमी नाही
गटाचे सदस्य डेमंड मुलिस म्हणाले, कृष्णवर्णीय कुणापेक्षाही कमी नाहीत, हे जगाला सांगण्याची इच्छा आहे. एव्हरेस्टची चढाई करणे कृष्णवर्णीयांचे काम नाही, असे टाेमणे आम्हाला नेहमी एेकायला मिळायचे. म्हणूनच एव्हरेस्ट सर करायचेच, असा संकल्प आम्ही सर्वांनी मिळून केला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.