आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटनच्या पंतप्रधान शर्यतीचा ताजा अहवाल:ट्रुस पंतप्रधान होण्याची 90% शक्यता तर सुनक पिछाडीवर

लंडन6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटनचे नूतन पंतप्रधान हाेण्याच्या शर्यतीत लिझ ट्रुस यांनी ऋषी सुनक यांना पिछाडीवर टाकले आहे. स्मार्केट्सच्या ताज्या अहवालानुसार ऋषी सुनक पुढील पंतप्रधान हाेण्याची शक्यता केवळ १० टक्के आहे. ट्रुस मात्र पंतप्रधान हाेण्याची शक्यता ८९. २९ टक्के एवढी आहे. इतर उमेदवारांकडे एक टक्कादेखील शक्यता दिसत नाही. पाहणीनुसार ३१ टक्के सदस्यांनी सुनक यांना तर ४९ टक्के सदस्यांनी ट्रुस यांना काैल देण्याचे ठरवले आहे. १५ टक्के लाेकांनी मतदान करणार नसल्याचे ठरवले आहे.

६ टक्के लाेकांनी मतदानापासून दूर राहणार असल्याची भूमिका घेतली आहे. काॅन्झर्व्हेटिव्ह पार्टीचे आगामी नेते आणि देशाच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारांना टीकेला सामाेरे जावे लागले हाेते. आधी पक्षातून सुनक यांना पाठिंबा होता.

बातम्या आणखी आहेत...