आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनुष्यबळ संकट:ब्रिटनमध्ये 90 उड्डाणे रद्द, 15 हजार अडकले; अमेरिकेत 1000 विमाने उभी

लंडन/ न्यूयाॅर्क8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनानंतर हवाई वाहतूक पूर्ववत झाली असली तरी मनुष्यबळाचे संकट युरोपपासून ते अमेरिकेपर्यंतच्या प्रवाशांना अडचणींचा सामना करण्यास भाग पाडत आहे. ब्रिटनमध्ये स्थिती नियंत्रणाबाहेर जात आहे. सोमवारी लंडनच्या हिथ्रो विमानतळावर गोंधळाची स्थिती होती. विमान कंपन्यांनी आपली १० टक्के उड्डाणे रद्द करावीत, असे आदेश प्रवाशांचे व्यवस्थापन करण्यास अपयशी ठरलेल्या विमानतळ अधिकाऱ्यांकडून अचानक देण्यात आले. याचा ९० उड्डाणांवर थेट परिणाम झाला. उड्डाणे रद्द करण्याच्या आदेशामुळे सुमारे १५ हजार प्रवासी अडकले. याचदरम्यान मंगळवारी ब्रिटनच्या रेल्वे प्रवाशांनाही संकटाचा सामना करावा लागेल. देशात मंगळवारी ४० हजार रेल्वे कर्मचारी संपावर जातील. कारण सरकारसोबत रेल्वे कर्मचारी संघटनेची चर्चा निष्फळ ठरली आहे. संपामुळे देशभरात २० टक्के रेल्वेगाड्या धावणार नाहीत. याचा परिणाम ५ लाख लोकांवर होईल.

संकटाचे कारण : कोरोनात ३० हजार कर्मचारी कमी, आता पदे रिक्त
उड्डाणे रद्द होण्याचे सर्वात मोठे कारण मनुष्यबळाची टंचाई आहे. कोरोनापूर्वी ब्रिटनमध्ये ७४ हजार लोक विमान कंपन्यांत काम करत होते. कोरोनामुळे ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात केली. आता विमान वाहतूक क्षमता पुन्हा रुळावर आली आहे, पण कर्मचारी पुन्हा आले नाहीत. सोबतच विमानतळ आणि विमान सहकारी म्हणून काम करणाऱ्या ६६००० लोकांपैकी बहुतांश लोकांना कामावरून कमी केले आहे. नॅशनल स्टॅटिस्टिक्स ऑफिसच्या मते, देशात विविध क्षेत्रात १२,९५,००० पदे रिक्त आहेत.

उड्डाणांची संख्या कमी करणार
ईझीजेटतर्फे सांगण्यात आले की, मनुष्यबळ संकटाचा सामना करणाऱ्या विमानतळाची स्थिती पाहता आमच्या उड्डाणांच्या स्थितीत बदल करत आहोत. या महिन्याच्या अखेरपर्यंत ४००० फ्लाइट कमी ठेवू. तर जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये १० हजार फ्लाइट्स कमी करू.

विमान कंपनीकडून खंत
एअरलाइनने सांगितले की, आम्ही गॅटविक व अॅम्सटरडमसारख्या विमानतळांवर अभूतपूर्व निर्बंधांनंतर कारवाई केली होती. यावर आम्ही खंत व्यक्त करतो. सीईओ जोहान लुंडग्रेन म्हणाले, आपल्या ग्राहकांसाठी सुरक्षित व विश्वासार्ह सुविधा देण्याला ईझीजेटचे सर्वोच्च प्राधान्य आहे.

अमेरिकेत १४ हजार उड्डाणे रद्द
अमेरिकेत या आठवड्यात १००० उड्डाणे रद्द केली. हे मिळून १४ हजार उड्डाणे या महिन्यात रद्द झाली आहेत.

बेल्जियममध्येही विमानतळ बंद
बेल्जियमचे ब्रुसेल्स विमानतळ बंद केले आहे. तिथेल सुरक्षा रक्षक संपावर गेले आहेत.

बातम्या आणखी आहेत...