आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

दिव्य मराठी विशेष:अमेरिकेत 90% लोक काेराेनाबाधित शक्य : पाहणी

वाॅशिंग्टनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमेरिकेच्या 22 राज्यांत काेराेनाच्या प्रकरणांत वाढ, तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता

काेराेना संसर्गाचा सर्वाधिक फटका बसलेल्या अमेरिकेसमाेरील अडचणी कमी हाेण्याची चिन्हे नाहीत. ९० टक्क्यांहून जास्त अमेरिकी काेराेनाबाबत अतिसंवेदनशील आहेत. म्हणजेच ३० काेटी अमेरिकी काेराेनाबाधित असू शकतात. सेंटर फाॅर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनचे (सीडीसी) संचालक डाॅ. राॅबर्ट रेडफील्ड यांनी हा दावा केला आहे. ते म्हणाले, सीडीसीने यासंबंधी एक पाहणी केली हाेती. देशातील संसर्गराेगतज्ज्ञ डाॅ. जीन मराजू यांच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेतील २२ राज्यांत गेल्या आठवड्याच्या तुलनेत रुग्णसंख्येत वाढ हाेत आहे. राष्ट्रीय स्तरावर अमेरिकेत दरराेज सुमारे ४३ हजारांहून जास्त रुग्ण येतात. देशात आॅगस्टनंतर मृत्यूंच्या संख्येत मुळीच घट हाेताना दिसून येत नाही. मराजू म्हणाले, काेराेना कहर असाच राहिल्यास वर्षअखेरीस देशात आणखी एक लाख अमेरिकींचा मृत्यू हाेऊ शकताे.

युनिव्हर्सिटी आॅफ वाॅशिंग्टन इन्स्टिट्यूट आॅफ हेल्थ मॅट्रिक्स अँड इव्हॅल्युशनच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेत या वर्षअखेरीस काेराेनामुळे ३.७८ लाख मृत्यू हाेऊ शकतात. मराजू यांनी इन्फेक्शन डिसीज साेसायटी आॅफ अमेरिकेच्या पत्रकार परिषदेत याबद्दल सविस्तर सांगितले. राजकीय काैल कसा आहे, यामुळे काहीही फरक पडणार नाही. कारण आकडे तर आकडे असतात. तुम्ही चर्चा करू शकत नाही. ही संख्या याेग्य दिशेने जात नाही. शाळा सुरू झाल्यानंतर संसर्गामुळे आणखी वाईट स्थिती निर्माण हाेण्याची शक्यता आहे. अमेरिकेत काेराेनाचे आतापर्यंत ७१,८७,१७९ रुग्ण आढळून आले. आतापर्यंत २ लाख ७ हजार ५५५ जणांचा मृत्यू झाला.

ड्राॅपलेट्सने काेराेना पसरताे याचे ठाेस पुरावे : फाॅसी
अमेरिकेचे संसर्गराेगतज्ज्ञ डाॅ. अँथनी फाॅसी म्हणाले, ताेंडावाटे बाहेर पडणाऱ्या सूक्ष्म घटकांद्वारे काेराेनाचा हवेतून संसर्ग हाेऊ शकताे. एअराेसाेल ट्रान्समिशनद्वारे ड्राॅपलेट्स लगेच खाली पडत नाहीत. ते काही अंतरावर जाऊन काही वेळासाठी हवेत टिकून राहतात. सामान्यपणे तुमच्याकडे एखाद्या बाधित व्यक्तीकडून ड्राॅपलेट्स आल्यास ते ६ फुटांपर्यंत जातात. मास्क परिधान केलेला असल्यास व तुम्ही ६ फुटांचे अंतर राखले असल्यास तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. परंतु वातावरण खराब असल्यास धाेका वाढू शकताे.