आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

बीजिंग:चीनच्या सर्वात मोठ्या अणुकेंद्रात 90 शास्त्रज्ञांचे राजीनामे, आरोप : सरकारचा दबाव, सुविधाही मिळत नसल्याचा आरोप

बीजिंग3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 500 शास्त्रज्ञांच्या संशोधन संस्थेत आता 100 पेक्षाही कमी लोक, सेंटर चालवणे कठीण

चीनचे सर्वात मोठे रिसर्च सेंटर ‘द इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लियर एनर्जी सेफ्टी टेक्नॉलाॅजी’मध्ये (आयनेस्ट) गुरुवारी ९० अणू शास्त्रज्ञांनी राजीनामे दिले. सुमारे ५०० सदस्यांच्या सोबत काम करणाऱ्या संस्थेत गेल्या वर्षी २०० शास्त्रज्ञांनी राजीनामे दिले होते. आता येथे १०० हून कमी लोक आहेत. आता ही संस्था चालवणे खूप कठीण झाले आहे. शास्त्रज्ञांनी राजीनामे देण्याची कारणे वेगवेगळी सांगितली जात आहेत. पण सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाला या संस्थेवर संपूर्ण ताबा मिळवून दबावाखाली काम करून घ्यायचे आहे. जून महिन्यात आयनेस्टमध्ये काम करणाऱ्या लोकांचा त्यांच्याच पालक संस्थेशी वाद झाला. याशिवाय येथील शास्त्रज्ञांना आवश्यक संसाधने आणि सेवा-सुविधा देण्यात येत नाहीत. कामातही माेकळीक नाही. चायनीज विज्ञान अकादमीच्या आदेशावर या केंद्रात काम होते.

आयनेस्ट चीनमधील खूप महत्त्वाची संस्था असून तिने २०० हून अधिक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय प्रकल्पात सहभाग घेतला आहे. चीनने १९५० मध्ये अणू कार्यक्रम सुरू केला. त्यांच्याकडे सुमारे ३०० हून अधिक अण्वस्त्रे तयार आहेत. दरम्यान, त्यांच्या विस्तारवादी धोरणाला अमेरिका, ब्रिटन, जपान आिण ऑस्ट्रेलिया मिळून अनेक देशांनी आव्हान दिले आहे. चीनच्या अध्यक्षांना अण्वस्त्रे हल्ला करण्याचे आदेश देण्याचे अधिकार नाहीत. ते पॉलिट ब्यूरोला आहेत. जिनपिंग दोन्ही आघाड्यांवर लढत आहेत. शास्त्रज्ञांचे राजीनामे हा त्या दबावाचाच एक भाग आहे.

चीन विज्ञानाचे पॉवर हाऊस व्हावे म्हणून १६ हजार शास्त्रज्ञांनी सोडला यूएस
चीनमध्ये सरकारच्या आवाहनानंतर चीन विज्ञानात पॉवर हाऊस व्हावा म्हणून गेल्या वर्षी अमेरिका व युरोपात काम करणाऱ्या १६ हजारांहून अधिक शास्त्रज्ञांनी मायदेशी जाण्याचा रस्ता धरला. या शास्त्रज्ञांना परदेशात मिळतात त्या सर्व मूलभूत सुविधा देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. परंतु येथे आल्यानंतर त्यांचा भ्रमनिरास झाला. आयनेस्टमध्ये शास्त्रज्ञांनी राजीनामे देण्याचे हेही एक कारण मानले जात आहे.