आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोरोना संकट:अमेरिकेत 2 आठवड्यातच 97 हजार मुले झाली कोरोनाबाधित : अहवाल

वॉशिंग्टनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमेरिकेत 3.38 लाख मुले कोरोनाच्या तावडीत

अमेरिकेत जुलैच्या शेवटच्या दोन आठवड्यात ९७ हजार मुले कोरोनाबाधित झाली आहेत. अमेरिकन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स अँड चिल्ड्रन हॉस्पिटल असोसिएशनच्या अहवालात हा दावा करण्यात आला आहे. अहवालानुसार ३० जुलैपर्यंत अमेरिकेत ३.३८ लाख मुले कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहेत. याचाच अर्थ २९% मुले केवळ दोन आठवड्यात बाधित झाली. एकट्या दक्षिण व पश्चिमेकडील राज्यांत असे ७०% प्रकरणे आहेत. यात मिसौरी, ओक्लाहोमा, अलास्का, नेवादा, इडाहो, मोंटाना आणि इतर राज्यांचा समावेश आहे. टेक्सास आणि न्यूर्याक राज्याचा अहवाल अद्याप आलेला नसल्याने या संख्येत आणखी वाढ होऊ शकते. न्यूजर्सीसारख्या ईशान्य राज्यांत मुलांच्या संसर्गाची प्रकरणे कमी आहेत. येथे मार्च-एप्रिलमध्ये संसर्ग सर्वाेच्च पातळीवर होता. विशेष म्हणजे बहुतांश मुलांमध्ये आधी कोरोनाची लक्षणे दिसली नव्हती. कोरोनामुळे मुलांच्या मृत्यूच्या संख्येचा अहवालात खुलासा करण्यात आलेला नाही.

अनेक राज्यांत शाळा सुरू, रुग्ण आढळल्याने बंदही
अमेरिकेतील अनेक राज्यांत शाळा सुरू झाल्यानंतर हा अहवाल आला. वाढत्या संसर्गामुळे काही शाळा पुन्हा बंद कराव्या लागल्या. दरम्यान, जॉर्जियातील एका शाळेच्या सोशल मीडियावरील छायाचित्रांकडे लोकांचे लक्ष गेले आहे. या शाळेच्या व्हरंड्यात विद्यार्थ्यांची गर्दी दिसत होती. विरोध झाल्यानंतर शाळेने ऑनलाइन वर्गाचा निर्णय घेतला.

न्यूझीलंड : १०१ दिवसांत एकही नवा रुग्ण नाहीन्यूझीलंडमध्ये मागील १०१ दिवसांपासून नवीन रुग्ण आढळला नाही. येथे मार्चमध्ये कडक लॉकडाऊन होते. ओटागो विद्यापीठातील तज्ञ प्रा. मायकल बेकर म्हणाले, ही चांगले विज्ञान व चांगल्या राजकीय नेतृत्वाची कमाल आहे.

श्रीलंका : ४ महिन्यांनी शाळा पूर्ण उघडल्याश्रीलंकेत सुमारे ४ महिन्यांपासून बंद शाळा सोमवारपासून पुन्हा पूर्णपणे सुरू करण्यात आल्या. जुलैत काही निवडक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र, संसर्ग वाढल्याने त्या बंद करण्यात आल्या.

0