आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीन:एक महिन्यानंतर नवे 99 रुग्ण, पण लॉकडाऊननंतर वुहानचा मोकळा श्वास

बीजिंग3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
मँचेस्टर : ब्रिटनमध्ये कोेरोनामुळे तणाव असला तरी लोकांमध्ये सकारात्मकता दिसून येते. - Divya Marathi
मँचेस्टर : ब्रिटनमध्ये कोेरोनामुळे तणाव असला तरी लोकांमध्ये सकारात्मकता दिसून येते.
  • दुसरीकडे वुहानमध्ये अनेक दिवसांनंतर जनजीवन सुरळीत होत आहे

चीनमध्ये कोरोनाची ९९ प्रकरणे समोर आली आहे. हे गेल्या महिनाभरातील सर्वाधिक आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले, यातील ६३ जणांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसली नाही. देशात कोरोना रुग्णांची संख्या ८२,०५२ झाली आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगानुसार, नवीन प्रकरणांमुळे ९७ जण विदेशातून परतलेले आहे.

विषाणूचा केंद्रबिंदू हुबेई प्रांत आणि राजधाूनी वुहानमध्ये याच्या प्रसारावर नियंत्रण मिळवल्यानंतर कोरोना प्रकरणांचा आकडा वाढणे चिंतेचा विषय आहे. आयोगाचे प्रवक्ता मी फेंग यांनी लोकांना गर्दी टाळण्याचे आवाहन केले. 

इतर देशांत अडकलेले चीनी नागरिक देशात परतल्यानंतर प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. परतणाऱ्यांची तपासणी करून त्यांना १४ दिवसांसाठी क्वॉरंटइन करण्यात आले आहे. दुसरीकडे वुहानमध्ये अनेक दिवसांनंतर जनजीवन सुरळीत होत आहे. 

बातम्या आणखी आहेत...