आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिका:अमेरिकेतील कृष्णवर्णीयांचे मारेकरी 99% पोलिसांवर खटलेच चालत नाहीत

जोसिआ बेट्स, लिसांड्रा विला2 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • जाॅर्ज फ्लाइड मारला गेला तिथे कृष्णवर्णीयांवर पोलिसांचे अनेक वर्षांपासून अमानुष अत्याचार

या दिवसात जगभरात प्रसिद्ध मिनियापोलिस शहर काळ्या लोकांवरील पोलिसांच्या क्रौर्यामुळे गतिशील आहे. येथे २५ मे रोजी एका गोऱ्या पोलिस अधिकाऱ्याने काळ्या वर्णाच्या जॉर्ज फ्लॉइडची गळा आवळून हत्या केली होती. यानंतर शेकडो शहरांमध्ये हिंसा भडकली. बऱ्याच वर्षांपासून मिनियापोलिसचे सामाजिक कार्यकर्ते आणि काही संस्था पोलिस अत्याचाराविरुद्ध मोहीम राबवत आहेत. पोलिस कर्मचाऱ्यांना शिक्षा न मिळाल्यामुळे अशा घटना वारंवार घडत असल्याचा या कार्यकर्त्यांचा युक्तिवाद आहे. मॅपिंग पोलिस हिंसाचार संघटनेच्या म्हणण्यानुसार अमेरिकेत २०१३ ते २०१९ दरम्यान झालेल्या हत्यांमधील ९९% पोलिस अधिकाऱ्यांंविरुद्ध खटले कोर्टात सादर केले नाहीत. या प्रकरणांचा तपास संथगतीने सुरू आहे.

सिटी कौन्सिल, राज्य विधानसभेत कार्यकर्त्यांनी आपल्या मागण्या पोहोचवल्या आहेत. ते इशारा देत राहिले की रंगभेद, आर्थिक विषमता आणि पोलिसांची आक्रमक वृत्ती सुधारली नाही तर ही परिस्थिती स्फोटक होऊ शकते. कार्यकर्त्या सँड्रा रिचर्डसन म्हणाली, "तुम्ही जर मिनियापोलिसमधील लोकांशी बोललात तर ते सांगतील की आम्ही स्फोटकांच्या ढिगावर बसलो आहोत. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काळे पुरुष आणि स्त्रियांची हत्या करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली पाहिजे. मिलियापोलिस अ‍ॅग्सबर्ग विद्यापीठाचे इतिहासातील प्राध्यापक विल्यम ग्रीन म्हणतात, पोलिसांच्या जबाबदारीची परिस्थिती बदलत नाही, तोपर्यंत काहीच होणार नाही. २०१४मध्ये दोन कृष्णवर्णीय एरिक गार्नर आणि मायकेल ब्राउन यांना पोलिसांनी ठार मारल्यानंतर सुरू झालेल्या ब्लॅक लाइव्हस मॅटर चळवळीत लोक उत्साहाने सहभागी झाले. मिनेसोटामध्ये २०१५ आणि २०१६ मध्ये दोन कृष्णवर्णीय जमर क्लार्क, फिलँडो कॅसिलो यांचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाल्यानंतर जबरदस्त निदर्शने झाली. या दोन्ही प्रकरणात कोणत्याही पोलिस अधिकाऱ्याला शिक्षा लागली नाही; परंतु या घटनांनी लोकांना संघटित केले आहे.

कोरोना पीडितांमध्ये कृष्णवर्णीय संख्या जास्त

मिनेसोटा राज्य अनेकदा अमेरिकेत राहण्यासाठी एक चांगले ठिकाण म्हणून सादर केले जाते. पण स्टार ट्रिब्यून या वृत्तपत्राच्या संशोधनानुसार, राज्यात गोरे आणि काळ्या लोकांमधील गरिबीचे अंतर जास्त आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या वेळी ही असमानता अधोरेखित झाली. राज्यातील कोरोना पीडितांमध्ये कृष्णवर्णीय लोक २२ टक्के आहेत. आणि राज्याच्या लोकसंख्येत कृष्णवर्णीयोची संख्या ७ % आहे.

महिलांच्या दु:खाकडेही कोणाचे लक्ष गेले नाही

अमेरिकेतीलकृष्णवर्णीय महिलाही पोलिसांच्या हिंसाचाराच्या बळी ठरतात. तथापि, त्यांच्या बाजूने संघटित हालचाली होत नाहीत.कृष्णवर्णीय महिलांना वर्णभेद आणि लैंगिक हिंसाचाराचा सामना करावा लागतो. २०१५ मध्ये पीडित महिलांसाठी हर कॅम्पेन नावाची संस्था स्थापन केली. यात या महिलांवर अत्याचार आणि खुनाची प्रकरणे समोर आली आहेत.

सिटी कौन्सिल, राज्य विधानसभेत कार्यकर्त्यांनी आपल्या मागण्या पोहोचवल्या आहेत. ते इशारा देत राहिले की रंगभेद, आर्थिक विषमता आणि पोलिसांची आक्रमक वृत्ती सुधारली नाही तर ही परिस्थिती स्फोटक होऊ शकते. कार्यकर्त्या सँड्रा रिचर्डसन म्हणाली, "तुम्ही जर मिनियापोलिसमधील लोकांशी बोललात तर ते सांगतील की आम्ही स्फोटकांच्या ढिगावर बसलो आहोत. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काळे पुरुष आणि स्त्रियांची हत्या करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली पाहिजे. मिलियापोलिस अ‍ॅग्सबर्ग विद्यापीठाचे इतिहासातील प्राध्यापक विल्यम ग्रीन म्हणतात, पोलिसांच्या जबाबदारीची परिस्थिती बदलत नाही, तोपर्यंत काहीच होणार नाही. २०१४मध्ये दोन कृष्णवर्णीय एरिक गार्नर आणि मायकेल ब्राउन यांना पोलिसांनी ठार मारल्यानंतर सुरू झालेल्या ब्लॅक लाइव्हस मॅटर चळवळीत लोक उत्साहाने सहभागी झाले. मिनेसोटामध्ये २०१५ आणि २०१६ मध्ये दोन कृष्णवर्णीय जमर क्लार्क, फिलँडो कॅसिलो यांचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाल्यानंतर जबरदस्त निदर्शने झाली. या दोन्ही प्रकरणात कोणत्याही पोलिस अधिकाऱ्याला शिक्षा लागली नाही; परंतु या घटनांनी लोकांना संघटित केले आहे.

फ्लाॅइडच्या निधनानंतर कार्यकर्ते ताकदीने सक्रिय झाले. पोलिस विभागाचे बजेट कमी करण्याची मागणी केली आहे. कृष्णवर्णीयांचे रक्षण करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे पोलिसमुक्त भविष्य. रेकलाम दा ब्लॉक समूहाने पोलिसांच्या बजेटमधील ४५० दशलक्ष डॉलर्स कमी करून ते कृष्णवर्णीयां खर्च करावे असे सिटी कौन्सिलला सांगितले आहे.

पोहोचवल्या आहेत. ते इशारा देत राहिले की रंगभेद, आर्थिक विषमता आणि पोलिसांची आक्रमक वृत्ती सुधारली नाही तर ही परिस्थिती स्फोटक होऊ शकते. कार्यकर्त्या सँड्रा रिचर्डसन म्हणाली, "तुम्ही जर मिनियापोलिसमधील लोकांशी बोललात तर ते सांगतील की आम्ही स्फोटकांच्या ढिगावर बसलो आहोत. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काळे पुरुष आणि स्त्रियांची हत्या करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली पाहिजे. मिलियापोलिस अ‍ॅग्सबर्ग विद्यापीठाचे इतिहासातील प्राध्यापक विल्यम ग्रीन म्हणतात, पोलिसांच्या जबाबदारीची परिस्थिती बदलत नाही, तोपर्यंत काहीच होणार नाही. २०१४मध्ये दोन कृष्णवर्णीय एरिक गार्नर आणि मायकेल ब्राउन यांना पोलिसांनी ठार मारल्यानंतर

बातम्या आणखी आहेत...