आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएका 14 वर्षीय मुलीने आपल्या आईच्या हत्येची सुपारी दिली, असे तुम्हाला कुणी सांगितले तर तुमचा विश्वास बसेल का? नाही! तर मग ऐका. रशियाच्या मॉस्कोत अशी घटना घडली आहे. येथील एका 14 वर्षीय टीएनएजरवर आपल्या 15 वर्षीय मित्राच्या मदतीने आपल्या आईची सुपारी देऊन हत्या केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. हा मुलगा तिच्या कुटुंबीयांच्या फ्लॅटमध्ये राहत होता. तो तिचा प्रियकर असल्याचा दावा केला जात आहे.
'3,650 पौंडमध्ये दिली आईची सुपारी'
द सनच्या वृत्तानुसार, या मुलीने आपल्या आईच्या हत्येसाठी 2 मुलांना 3650 पौंडची (जवळपास 3 लाख रुपये) सुपारी दिल्याचा आरोप आहे. मृत अनास्तासिया यांनी आपल्या मुलीला तिच्या बॉयफ्रेंडपासून दूर राहण्यास सांगितले होते. तसेच मुलालाही तशी तंबी दिली होती. यामुळे नाराज झालेल्या मुलीने इस्टेट एजंट असणारी आपली आई अनास्तासियाच्या हत्येची सुपारी देऊन तिची निर्घृण हत्या केली.
प्लॅस्टिक व गादीत गुंडाळला मृतदेह
मुलीने आईची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह प्लॅस्टिक व गादीत गुंडाळला. त्यानंतर तो मॉस्को क्षेत्रातील बालाशिखा शहरातील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकून दिला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी एका स्थानिक चौकीदाराच्या निदर्शनास हा मृतदेह पडला. त्याने ती माहिती पोलिसांना दिली. प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, "मृत महिलेला बेदम मारहाण करण्यात आली होती. तिचा गळा घोटण्यात आला होता. तिचा संपूर्ण चेहरा लाल व सूजलेला होता."
मारेकऱ्यांचे वय 14 ते 17 वर्षे
उल्लेखनीय बाब म्हणजे या हत्याकांडात सहभागी असणाऱ्या सर्वच संशयितांचे वय 14 ते 17 वर्षांचे आहे. त्यांच्यावर हत्या व हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी महिनाभर बालसुधार गृहात राहतील. त्यांची चौकशी सुरू आहे. मुली व मुलावर मारेकऱ्यांना फ्लॅटमध्ये प्रवेश दिल्याचाही ठपका ठेवण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.
मुलीची आईच्या पैशांवर बॉयफ्रेंडसोबत ऐश करण्याची होती इच्छा
तपास समितीच्या माहितीनुसार, मुलगी व तिच्या बॉयफ्रेंडचा तिच्या आईच्या 30 हजार पौंडच्या सेव्हिंगवर नजर होती. मुलीच्या एका मित्राने पोलिसांना सांगितले की, तिने अनेकदा आपण आपल्या आईचा द्वेष करत असल्याचे सांगितले. पण तिची आई एक चांगली व्यक्ती होती. तिचे तिच्यावर खूप प्रेम होते.
आरोपी मुलीच्या आजीने सांगितले की, माझ्या नातीला त्या मुलाने वाईट नादाला लावले. त्या मुलाची पार्श्वभूमी चांगली व्हती. अन्य सूत्रांच्या माहितीनुसार, पीडिता आपल्या मुलीची देखभाल करत होती. तिच्या चांगल्या भविष्यासाठी प्रयत्नरत होती. आरोपी मुलांना किमान 10 वर्षांची शिक्षा होईल, असा अंदाज आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.