आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • A 16 year old Student Start School Under A Tree For Children Deprived Of Education In The City Due To Corona

इक्वेडोर:कोरोनामुळे शहरातील शिक्षणापासून वंचित मुलांसाठी 16 वर्षीय विद्यार्थिनीची झाडाखाली शाळा, 40 मुलांना लाभ

गुआक्विल3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विद्यार्थ्यांना शाळेच्या संकेतस्थळावरील असाइनमेंट पाहून शिकवते
  • ब्लॅक बोर्ड, पोस्टर, इंटरनेटवर होणारा खर्च स्वत: उचलणार

इक्वेडोरची १६ वर्षीय हायस्कूलची विद्यार्थिनी डेनिसी तोआला सध्या चर्चेत आहे. कारण आहे तिने सुरू केलेली शाळा. तिच्या शाळेत ४० मुले दररोज शिक्षण घेतात. जगभरातील इतर देशांप्रमाणेच लॉकडाऊनमुळे इक्वेडोरमधील शाळाही बंद होत्या. परंतु नंतर ऑनलाइन अध्ययनाला सुरुवात झाली. गुआक्विलच्या परिसरातील भागात राहणाऱ्या शेकडो मुलांकडे मोबाइल व इंटरनेटची सुविधाही नाही. त्यामुळे हे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत होते. या समस्येविषयी माहिती मिळताच तिच्या मनात या विद्यार्थ्यांना मदतीचा विचार आला. त्यानुसार तिने निर्णय घेतला आणि घराजवळील एका झाडाखाली शाळा सुरू केली. मुलांना देण्यात आलेले होमवर्क डेनिसी शाळेच्या संकेतस्थळावर पाहते. त्यानंतर वर्गात मुलांना तेच शिकवते. संपूर्ण खर्चही डेनिसीच उचलते. गुआक्विल भागात कोरोनाचा मोठा संसर्ग आहे. अशा परिस्थितीत डेनिसीने घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक होत आहे.

देशात ऑनलाइन सुविधा नसल्याने मुलांना गल्लोगल्ली जाऊन अध्यापन

नीमचच्या मनासामध्ये धाकडखेडीच्या माध्यमिक शाळेत ऑनलाइन शिक्षणाची सोय नसल्याने ११५ मुले शिक्षणापासून वंचित होते. सर्व शिक्षकांनी मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी घरोघरी जाऊन दहा-दहाच्या गटाने अध्यापन करू लागल्या आहेत. यादरम्यान फिजिकल डिस्टन्सिंगचेदेखील पालन केले जात आहे. शिक्षक प्रल्हाद सोलंकी म्हणाले, अभ्यासक्रम अपूर्ण राहणार नाही. त्याचबरोबर घरी राहणारी मुलेही शिकू शकतील. रतलाम जिल्ह्यातही काहीशी अशीच स्थिती आहे. जावरा भागात सरकारी शाळेतील ५ हजार विद्यार्थ्यांसाठी स्मार्टफोनची व्यवस्था नाही. म्हणूनच केरवासा व पंचक्रोशीतील गावात बाबूलाल छाबडा, दिनेश शर्मा यांच्यासारखे शिक्षक मुलांना घरी जाऊन शिकवत आहेत. त्यासाठी दररोज कोणत्याही वसाहतीमध्ये खुल्या जागेत धडे गिरवले जातात.