आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • A 27 year old Female Journalist Of A Government TV Channel Has Been Shot Dead, 61 Journalists Killed In The Country In 28 Years

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाकिस्तानात पत्रकार असुरक्षित:सरकारी टीव्ही चॅनलच्या 27 वर्षीय महिला पत्रकाराची गोळ्या घालून हत्या, 28 वर्षात देशात 61 पत्रकारांच्या हत्या झाल्या आहेत

इस्लामाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महिला पत्रकाराचे नाव शाहीना शाहीन, ती पाकिस्तान टीव्हीत अँकर आणि रिपोर्टर होती
  • शाहीनला बलुचिस्तानच्या तुरबतमध्ये पाच गोळ्या घातल्या, तिला रुग्णालयात नेणारा फरार

पाकिस्तानमध्ये शनिवारी एका महिला पत्रकाराची गोळी घालून हत्या करण्यात आली. शाहीना शाहीन सरकारी टीव्ही चॅनल पाकिस्तान टीव्हीमध्ये एक अँकर आणि रिपोर्टर होती. काही दिवसांपूर्वी तिची बलुचिस्तानच्या तुरबतमध्ये बदली केली होती.शाहीन पूर्वी मागील वर्षी मे महिन्यात उरूज इक्बाल नावाच्या महिला पत्रकाराची देखील गोळ्या घालून हत्या केली होती.

रिपोर्ट्सनुसार, 1992 पासून आतापर्यंत 28 वर्षांत पाकिस्तानात 61 पत्रकारांच्या हत्या झाल्या आहेत. दरम्यान पाकिस्तानात पत्रकार सुरक्षित असल्याचे पंतप्रधान इमरान खान यांनी या आठवड्यात एका मुलाखतीत म्हटले होते.

युवा पत्रकार होती शाहीन

यापूर्वी शाहीनने इस्लामाबादमधील एका खासगी टीव्ही चॅनलमध्ये काम केले होते. यानंतर तिची निवड सरकारी टीव्ही चॅनेलमध्ये झाली. इस्लामाबादमध्ये काही महिने राहिल्यानंतर तिची बलूचिस्तानच्या तुरबतमध्ये बदली झाली. ती एका स्थानिक मासिकाची संपादक देखील होती. 27 वर्षीय शाहीन क्वेटा विद्यापीठातून पीएचडी करत होती.

मारेकरी फरार

शाहीनची हत्या तिच्या घरात घुसून करण्यात आली. पोलिसांनुसार, दोन मारेकरी तिच्या घरी पोहोचले होते. शाहीनने दरवाजा उघडताच तिच्यावर गोळीबार केला. यात तिला पाच गोळ्या लागल्या. पोलिसांनुसार, एका अज्ञात व्यक्तीने शाहीनला कारमधून रुग्णालयात दाखल केले. मात्र काही वेळानंतर तो गाडी तिथेच सोडून फरार झाला. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहे. शाहीनच्या कुटुंबियांनी काही लोकांनी गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये तिच्या पतीचा देखील समावेश आहे. शाहीनचा पाच महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता.

सरकारने दु: ख व्यक्त केले

बलूचिस्तान सरकारचे प्रवक्ते लियाकत शाहवानी यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, शाहीनच्या मारेकऱ्यांचा तपास सुरू आहे आणि लवकरच त्यांना अटक केली जाईल. मीडिया वॉचडॉग फ्रीडम नेटवर्कने देखील या घटनेवर दु:ख व्यक्त करत मारेकऱ्यांना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आहे.

पाकिस्तानात पत्रकार सुरक्षित नाहीत

मागील वर्षी मे महिन्यात महिला पत्रकार उरूज इक्बाल यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. ती एका खासगी टीव्ही चॅनलमध्ये काम करत होती. तिच्या कुटुंबियांनी एका स्थानिक नेत्यावर जीवे मारल्याचा आरोप केला होता. मात्र पोलिसांनी हा आरोप फेटाळून लावला. अद्यापही तिच्या मारेकऱ्यांचा अद्याप शोध लागला नाही. उरूजची हत्या तिच्या ऑफिसबाहेर करण्यात आली होती. मारेकरी एका कारमधून आले होते आणि नंतर आरामात पळून गेले. 1992 पासून पाकिस्तानमध्ये 61 पत्रकारांची हत्या झाली आहे.