आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • A 66 year old Indian origin Journalist Died Of Corona Infection In The United States After 9 Days In Hospital

कोरोना व्हायरस:मूळचे भारतीय असलेल्या 66 वर्षीय पत्रकाराचा अमेरिकेत संक्रमणाने मृत्यू, 9 दिवस रुग्णालयात राहिल्यानंतर घेतला अखेरचा श्वास

वॉशिंगटन3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ब्रह्म कंचीबोतला यांना पहिल्यांदा 23 मार्चला कोरोनाची लक्षणे दिसली होती, त्यांना 28 मार्चला लॉन्ग आयलँडच्या रुग्णालयात दाखल केले गेले

अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क कोरोनाचे एपिसेंटर बनले आहे. येथे कोरोनाने संक्रमित मूळचे भारतीय असलेले एक पत्रकार ब्रह्म कंचीबोतला (66) यांचा मृत्यू झाला आहे. मुलगा सुदामा याने सांगितले की, वडिल नऊ दिवसांपासून रुग्णालयात होते. कंचीबोतला यांना पहिल्यांदा 23 मार्चला कोरोनाची लक्षणे दिसली होती. तब्येत बिघडल्यानंतर 28 मार्चला लॉन्ग आयलँडच्या एका रुग्णालयात त्यांना दाखल केले गेले, जिथे त्यांना ऑक्सीजन मास्क दिला गेला. 31 मार्चपासून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले गेले होते. 6 एप्रिलच्या सकाळी त्यांनी प्राण सोडले. ब्रह्म यांच्या कुटुंबामध्ये मुलगा सुदामा, पत्नी अंजना आणि मुलगी सिअुजाना आहे.   अमेरिकेमध्ये आतापर्यंत 12 हजार 841 लोकांचा मृत्यू झाला आहे. येथे चार लाख लोक संक्रमित झाले आहेत. यामध्ये 4,758 मृत्यू एकट्या न्यूयॉर्कमध्ये झाले आहेत. न्यूयॉर्क सिटीमध्ये मृतदेह पुरण्यासाठी स्मशानभूमीत जागा शिल्लक नाही. अधिकारी सार्वजनिक ठिकाणी मृतदेहांचे तात्पुरते दफन करण्याच्या योजनेवर कार्य करीत आहेत. जेव्हा परिस्थिती चांगली होईल तेव्हा कुटुंबाच्या इच्छेनुसार मृतदेह योग्य जागी पुरला जाईल.

ब्रह्म कंचीबोटला यांच्या निधनाने दुःखी आहे : पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून सांगितले, ‘‘भारतीय अमेरिकी पत्रकार ब्रह्म कंचीबोटला यांच्या निधनाने दुःखी आहे. भारत आणि अमेरिकेला जवळ आणण्याच्या त्यांच्या प्रयत्नांसाठी नेहमी त्यांचे स्मरण केले जाईल. त्यांच्या कुटुंबीयांना माझ्या संवेदना. ओम शांती.’’

कंचीबोतला यांच्या मुलाने सांगितले, ‘‘कोरोनाबद्दल न्यूयॉर्कमध्ये अनेक प्रतिबंध लावले गेले आहेत. अशात हे माहित नाहीये की, त्यांचे अंत्यसंकस्कार केव्हा होईल. आम्ही अद्याप यासाठी कोणतीही तारीख ठरवलेली नाही. यामध्ये खूप कमी लोक सामील होऊ शकतील. सरकारने अंत्यसंस्काराच्या केवळ 10 लोकांना सामील होण्याची परवानगी दिली आहे.’’ 

28 वर्षांपासून अमेरिकेमध्ये होते कंचीबोतला... 

कंचीबोटला मागील 28 वर्षांपासून अमेरिकेमध्ये राहात होते. भारतातील अनेक मीडिया संस्थांमध्ये सेवा दिल्यानंतर ते 1992 मध्ये अमेरिकेला गेले होते. त्यांनी मर्जर मार्केट्स नावाच्या फायनान्शियल पब्लिकेशनमध्ये 11 वर्षे सेवा दिली. यासोबतच न्यूज इंडिया टाइम्स साप्ताहिक वृत्तपत्रातदेखील काम केले. ते सध्या न्यूज एजन्सी यूएनआयचे वार्ताहर म्हणून काम पाहात होते. 

बातम्या आणखी आहेत...