आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दशकातील सर्वात भीषण बर्फवृष्टीचा युद्धात अडथळा:हिमवादळामुळे बखमुटात लढाई थांबली, रशियासाठी स्थिती दयनीय

कीव्ह/ मॉस्को2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

युक्रेनमध्ये मोठी हिमवृष्टी होत आहे. ही दशकातील सर्वात भीषण हिमवृष्टी असल्याचे सांगितले जाते. बखमुटात हिमवादळ आले आहे. यामुळे रशियन पायदळाला लढाईत अडचणी येत आहेत. यामुळे शनिवारी बखमुटात युद्ध रोखावे लागले. युद्धासाठी ही स्थिती आणखी दयनीय होण्याची शक्यता आहे. कारण, हे क्षेत्र मीठाग्राचे आहे. सखल भाग जास्त असल्यामुळे बर्फ जमा होण्याची शक्यता आहे. यासोबत जेव्हा हवामान स्वच्छ होईल,तेव्हा बर्फ वितळेल. यामुळे बंकरमधील माती चिखलात रूपांतरित होऊन गारठा वाढेल. पुढे रशिया आणि युक्रेनमध्ये “रासयुतित्सा’ नामक हवामानात चालणे कठीण असते.

युक्रेन कोर्टाने प्रमुख पाद्र्यास नजरकैद केले : युक्रेनच्या एका न्यायालयाने एका प्रमुख ऑर्थाेडॉक्स पाद्र्यास घरात नजरकैद करण्याचा आदेश दिला. पाद्रीने रशियाचा हल्ला योग्य ठरवल्याचा आरोप आहे.