आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकेतील मध्यावधी निवडणूक राष्ट्रपती जाे बायडेन व माजी राष्ट्रपती डाेनाल्ड ट्रम्प दोघांच्या पुन्हा राष्ट्रपती निवडणुकीच्या शर्यतीत असण्याच्या अपेक्षांवर पाणी फेरणारी ठरली आहे. ट्रम्प यांच्या उमेदवारांच्या पराभवाने स्पष्ट झाले आहे की, लोक आता नव्या चेहऱ्यांना पसंत करत आहेत. तथापि, या निवडणुकीमध्ये हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या ५ खासदारांसह अन्य पदांवर १० भारतवंशीयांचा विजय झाला. रिपब्लिकन्स व डेमाेक्रॅट्स यांच्यातील चुरशीच्या लढतीत सिनेटसाठी दोघांच्या खात्यात ४८-४८ जागा आल्या आहेत. मात्र, बहुमत मिळवण्यासाठी ५० जागांवर विजय मिळवणे अनिवार्य आहे. हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये बहुमताचा आकडा २१८ आहे. राष्ट्रपती जो बायडेन यांचा डेमोक्रॅटिक पक्ष १९८ जगांसह आघाडीवर आहे, तर ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाने १७८ जागा जिंकल्या आहेत. राेन डिसेंटिस यांच्या फ्लाेरिडा गव्हर्नर निवडणुकीतील विजयामुळे रिपब्लिकन पक्षाकडून राष्ट्रपतिपदासाठी त्यांची दावेदारी मजबूत झाली आहे. विश्लेषकांनी भास्करला सांगितले की, हा निकाल ट्रम्प आणि त्यांच्या राजकारणासाठी अनुकूल नाही, तर मतदारांना नवा चेहरा हवा आहे. तथापि, बायडेन यांचा अजेंडाही अधांतरी राहू शकतो. पक्षाने आपल्या पारंपरिक जागाही गमावल्या आहेत. बायडेन यांचे अजेंडे रिपब्लिकन रोखू शकतो.
भारतीय वंशाच्या दहा जणांनीही मिळवला विजय बायडेन यांच्या पक्षाच्या खराब कामगिरीदरम्यान डेमाेक्रॅट पक्षाकडून चार भारतीय हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हसाठी निवडले गेले आहेत. प्रमिला जयपाल, राजा कृष्णमूर्ती, राे खन्ना हे हाऊसमध्ये चाैथ्या कार्यकाळासाठी निवडून आले. हाऊसमध्ये निवडण्यात आलेल्या भारतीय वंशाच्या लोकांमध्ये नवे नाव डेमाेक्रॅटिक श्री ठाणेदार यांचे आहे. ते मिशिगनमधून जिंकले आहेत. मिशिगनमधून जिंकणारे ते पहिले भारतीय आहेत. भारतीयांमध्ये सर्वात ज्येष्ठ अॅमी बेरा यांच्या निकालाची प्रतीक्षा आहे. ते हाऊसमध्ये सहाव्या कार्यकाळासाठी मैदानात उतरले आहेत. अरुणा मिलर (५८) या मेरीलँड लेफ्टनंट गव्हर्नर निवडणुकीत विजय मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय अमेरिकन नेत्या ठरल्या आहेत. ५८ वर्षीय डेमोक्रॅट नेत्या हैदराबादच्या आहेत. इलिनाॅइस राज्य विधानसभेत नबिला सय्यद (२३) निवडून येणाऱ्या सर्वात तरुण सदस्या आहेत. मॅगन श्रीनिवास अायाेवा हाऊससाठी निवडून आले. वंदना स्लेटर पुन्हा वाॅशिंग्टन स्टेटमधून निवडून आल्या. अरविंद व्यंकट पेनसिल्वेनियामधून जिंकले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.