आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरिकांना न्याय:दंड वाचवण्यासाठी खराब कारच्या नंबरप्लेट दुरुस्त करण्याची मोहीम

कोरे किलगानोन | ब्रुकलिन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर आपल्या सायकलींचे पॅडल मारत बसताना गर्श कुंट्जमॅनची नजर रस्त्याच्या कडेला उभ्या कारच्या रांगेवर असते. ते एक पांढरी निशान रॉग कारसमोर थांबतात. कारच्या मोडतोड झालेली नंबरप्लेट वाचता येत नव्हती. कुंट्जमॅन म्हणाले, मला अशा नंबरप्लेट दुरुस्त करणे आवडते. आजूबाजूला कारमालक दिसला नाही तर ते स्वत: नंबरप्लेट सरळ करतात. नंतर ते आपल्या पुढील लक्ष्यासाठी पुढे जातात. अशा गाड्यांची संख्या कमी नाही. न्यूयॉर्कमध्ये अधिक वेग, रेडलाइटवर नजर ठेवणारे कॅमेरे आणि पूल, रस्त्यावर टोलपासून वाचण्यासाठी अनेक चालक आपल्या वाहनांची नंबरप्लेट कॅमेराप्रूफ स्क्रीनद्वारे झाकून टाकतात. त्यावर रंग टाकतात. स्टिकर, टेप किंवा इतर वस्तू चिकटवतात. ते प्लेटवरील अक्षरे घासतात किंवा तात्पुरता पेपर टॅग लावतात. परंतु ही प्रवृत्ती वाढत असतानाच कुंट्जमॅनसारख्या जागरूक लोकांची संख्याही वाढत आहे. हे लोक खराब केलेली नंबरप्लेट शोधतात आणि तिची दुरुस्ती करतात. त्यांनी नियम मोडण्याच्या या प्रकाराविरुद्ध जागरुकता मोहीम सुरू केली आहे.

शहरातील अधिकारी सांगतात की, अशा वाहनांमुळे शहर आणि ट्रान्सपोर्ट विभागाला दरवर्षी ८०० कोटी रुपयांवर नुकसान होते. कुंट्जमॅनसारख्या नागरिकांच्या मते अवैध नंबरप्लेटमुळे शहरात धोकादायक ड्रायव्हिंगला चालना मिळते. या वर्षी १२५ पादचारी आणि सायकलचालकांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला. न्यूयॉर्कमध्ये वाहनांच्या नंबरप्लेटचे फोटो काढणे किंवा त्या दुरुस्त करण्याचे काम सोपे नाही. अनेक निरीक्षकांवर हल्ले झाले आहेत. कुंट्जमॅन यांच्यावर हल्ला झालेला नाही, पण त्यांना धमक्या नक्कीच मिळत आहेत. ते नंबरप्लेटवर लावलेले कव्हर किंवा बोगस प्लेट हटवण्यासाठी सोबत स्क्रू ड्रायव्हरच घेऊन फिरतात.

वकिलाला अटक गेल्या महिन्यात सुरक्षित रस्त्यांसाठी मोहीम चालवणारे अॅड. अॅडम व्हाइट यांनी ब्रुकलिनमध्ये एका एसयूव्हीची नंबरप्लेट लपवलेले कव्हर हटवले होते. त्यांना गुन्हेगारीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. नंतर आरोप मागे घेण्यात आला. त्यांना सोडून दिले. यामुळे शहरात अशा अभियानाला अधिक समर्थन मिळत आहे.

बातम्या आणखी आहेत...