आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटीश जोडप्याने मुलाचे नाव ठेवले 'पकोडा':पती-पत्नीला आवडला भारतीय पदार्थ, नेटिझन्स म्हणाले- पुढील मुलाचे नाव असेल समोसा

25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोक सहसा आपल्या मुलांची नावे प्रसिद्ध व्यक्तींच्या नावावर ठेवतात. पण ब्रिटनमधील एका जोडप्याने आपल्या मुलाचे नाव भारतीय पदार्थावरुन ठेवले आहे. आयर्लंडमधील न्यूटाउनबेबी येथे राहणाऱ्या या जोडप्याने आपल्या मुलाचे नाव 'पकोडा' असे ठेवले आहे.

द कॅप्टन्स टेबल नावाच्या रेस्टॉरंटने सोशल मीडियावर ही माहिती दिली. वास्तविक, हे जोडपे या रेस्टॉरंटमध्ये जेवण करायला आले होते. मेनू कार्डवर भारतीय पदार्थ होता. त्यांनी पकोड्याची ऑर्डर दिली. त्याला ते इतके आवडले की त्यांनी आपल्या नवजात बाळाचे नाव 'पकोडा' ठेवले.

मजेदार प्रतिक्रिया
या फोटोवर नेटिझन्स खूप मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. फोटो शेअर करताना एका यूजरने लिहिले की, तिच्या आजीचे नाव नान आहे. आणखी एका यूजरने लिहिले की, मलाही दोन मुले आहेत. त्यांचे नाव चिकन आणि टिक्का. आणखी एका यूजरने लिहिले की, मी गरोदरपणात खूप केळी आणि टरबूज खायचे. देवाचे आभार मानतो मी माझ्या मुलांचे नाव केळी आणि टरबूज ठेवले नाही. एका युजरने म्हटले की, आता यांच्या पुढच्या मुलाचे नाव समोसे असेल. त्याचवेळी आपल्या मुलाचा फोटो शेअर करताना एकाने लिहिले की, हा माझा मुलगा आहे, त्याचे नाव चिकन बॉल आहे.

सोशल मीडियावर व्हायरल फोटो
रेस्टॉरंटने ऑर्डरचे बिलही मुलासोबत सोशल मीडियावर शेअर केले. त्यावर लिहिले होते की, जगात पकोड्याचे स्वागत आहे. यावर लोक खूप चर्चा करत आहेत. ट्विटरवरही अनेकांनी ते शेअर केले आहे. या ट्विटला आतापर्यंत 26 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. 1500 हून अधिक लोकांनी याला रिट्विट केले आहे.

बातम्या आणखी आहेत...