आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यूयॉर्क:अमेरिकी विवाह पद्धतीत ‘जास्त वयाच्या अंतरा’च्या प्रथेत घट; चांगले शिक्षण आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे हे कारण : अभ्यास

न्यूयॉर्क3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लग्नात वधू आणि वराच्या वयात एक-दोन वर्षांचे अंतर असणे सामान्य बाब आहे. मात्र हा फरक २०-२२ वर्षांचा असेल तर लोक त्यास अपारंपरिक पद्धती ठरवतात. नव्या अभ्यासानुसार आता लग्नात वयातील जास्त अंतराचा ट्रेंड घटत असल्याचे दिसते. अमेरिकी जनगणना विभागच्या डेटानुसार, २० व्या शतकाच्या सुरुवातीस जास्त वयाच्या अंतरात लग्न करणारे स्त्री-पुरुष ३०% होते. ८०च्या दशकात हे घटून १०% पेक्षा काहीसे जास्त राहिले आणि आता ते घटून ३% झाले आहे. याचे मुख्य कारण चांगले शिक्षण आणि आर्थिक सक्षमता आहे.

अमेरिकेच्या कोलोराडो विद्यापीठात (बोल्डर) अर्थशास्त्र आणि या अभ्यासाचे लेखक प्रा. टॅरा मॅक्किनिश म्हणाल्या, जास्त वयाचे अंतर असणाऱ्या जोडप्यांना समाजाची मान्यता मिळत नाही. यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. नात्यात समस्या उद्‌भवल्यास जवळचे नातेवाईक वयातील वाढत्या अंतराकडे बोट दाखवतात. प्रत्यक्ष तसा संबंध नसला तरी लोक टीका करायची संधी सोडत नाहीत. मात्र, अशीच समस्या समान वयोगटातील नातेसंबंधात उद्भवल्यास समाज दांपत्याच्या बाजूने उभा राहतो.

जास्त वयाचे अंतर असताना लग्न करणारे दांपत्य आर्थिक मंदीत खचून जातात. समान वयोगटातील लग्न करणारे अशी स्थिती सांभाळतात, असा अभ्यासाचा निष्कर्ष आहे.ज्या पुरुषाची पत्नी वयाने लहान आहे त्याच्या समाधानाची पातळी सर्वात जास्त दिसली. उलट जास्त वयाची जोडीदार असणाऱ्या पुरुषांमध्ये समाधानाचा परिणाम कमी दिसला. नियम मोडून लग्न करणाऱ्यांमध्ये ही कमतरता समाजात होणारा बदल दिसतो, असे अभ्यासात आढळून आले आहे.

आदर्श वय अंतराचा ‘हॉफ प्लस सेव्हन रूल’ आता महत्त्वाचा नाही
तज्ज्ञांनुसार, काही वर्षांपूर्वीपर्यंत ‘हॉफ प्लस सेव्हन’चा नियम वय अंतरासाठी आदर्श मानला जात होता. त्यानुसार, मोठा सदस्य बऱ्याचदा पुरुषच असतो,असे गृहीत धरून पुरुषाचे वय (३० वर्षे) याच्या निम्मे (१५) आणि (+७) म्हणजे महिला जोडीदाराचे वय २२ असले पाहिजे. गेल्या दोन दशकांत हा नियम वरचढ राहिला. मात्र, सामाजिक बदलांनंतर याचे खूप महत्त्व राहिले नाही. मॅक्किनिशनुसार,एक शतकाआधी पुरुषांनी हा नियम निश्चित केला होता. त्यांनी याचा आधार लिंगास ठरवले होते. पुरुष घरासाठी कमाई करून आणतील आणि महिला घर व मुले सांभाळतील, या मॉडेलवर ते आधारित होते. त्यात स्पष्ट भेदभाव दिसत होता.

बातम्या आणखी आहेत...