आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ख्रिसमसचा बाजार:जर्मनीमध्‍ये ब्लॅक फॉरेस्टच्या दाट जंगलात सजला ख्रिसमस बाजार

बर्लिन5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जर्मनीतील सर्वात सुंदर ब्लॅक फॉरेस्टमध्ये ख्रिसमसचा बाजार सजला आहे. हा हायलँड्समध्ये डेव्हिल्स व्हॅलीच्या रेल्वे वायडक्टखाली सजणारा एकमेव ख्रिसमस बाजार आहे. इथे हिवाळ्यात नेहमी बर्फवृष्टी झाल्यानंतर संपूर्ण परिसर पांढरा होतो. हा बाजार ख्रिसमसच्या रंगीबेरंगी लायटिंगने सजल्याने तो आणखी आकर्षक दिसत आहे. यामुळे याला विंटर मॅजिकही म्हटले जाते. जंगलाच्या मधोमध असलेल्या बाजारात सूर्यप्रकाशही कमी येतो. ब्लॅक फॉरेस्टमध्ये ३ किलोमीटरपर्यंत असलेला हा बाजार लोकांना अॅडव्हेंचरची अनूभूती देतो. इथे विविध व्यंजनांपासून ते हाताने तयार केलेल्या लाकडाच्या आकर्षक मूर्ती, ग्लास-ब्लोइंग सजावटीच्या वस्तू, लोकरीच्या मोज्यांसह इतर साहित्याची दुकाने आहेत. या बाजारात बोन फायरच्या आसपास फिरणे आणि अल्फोर्नवर वाजणाऱ्या काही क्लासिक ख्रिसमस सुरांवर थिरकणे पर्टयकांचे खास आकर्षण आहे.

बातम्या आणखी आहेत...