आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • A Father's Hunger Strike Outside The Tokyo Olympic Stadium; Arjav For A Visit To The Children Of The Stomach, The Fight For Rights Continues; News And Live Updates

ओरिजनल:टोकियो ऑलिम्पिक स्टेडियमबाहेर एका पित्याचे उपोषण; पोटच्या लेकरांच्या भेटीसाठी आर्जव, हक्कासाठी लढा सुरू

टोकियो3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जपानमध्ये मुलांची कस्टडी आईला देण्याच्या कायद्याविरोधात वडिलांचा संघर्ष

टाेकियाे आॅलिम्पिक स्टेडियमबाहेर एक पिता १८ दिवसांपासून उपाेषणास बसले आहेत. फ्रान्सवंशीय विन्सेंट फिकाेट यांचा हा संघर्ष पाेटच्या मुलांच्या भेटीसाठी आहे. पत्नी तीन वर्षांपूर्वी मुलांना घेऊन गेली हाेती. जपानच्या कायद्यानुसार मुलांची कस्टडी आईकडे असते. जपानमध्ये दरवर्षी या नियमांतर्गत १.५ लाख मुले पालकांपासून वेगळी हाेतात. काेर्टही आईची बाजू घेते. वडिलांनी मुलांना भेटण्याचाही अधिकार नसताे. या कायद्याला फिकाेट यांनी आव्हान दिले. मुलांच्या भेटीसाठी हा मार्ग का निवडला याबद्दल फिकाेट यांनी सांगितले...

वडिलांच्या वेदना.. मुलांना भेटण्यासाठी नाेकरी-पैसा गमावला, सरकारांकडे आर्जव, प्राणत्यागासह तयार
मी १५ वर्षांपासून जपानमध्ये आहे. येथे बँकर हाेताे. २००९ मध्ये जपानी मुलीसाेबत विवाह केला. आम्हाला मुलगा त्सुबासा व मुलगी काएदा अशी मुले आहेत. मुलगा ६ वर्षांचा आहे. २०१८ मध्ये पत्नी काहीही न सांगता दाेन्ही मुलांना घेऊन निघून गेली. त्यानंतर मुले बेपत्ता व पत्नीच्या िवराेधात तक्रार करण्यासाठी ठाण्यात गेलाे. परंतु सुनावणी झाली नाही. नंतर काैटुंबिक न्यायालयात गेलाे. जपानच्या कायद्यात जाॅइंट कस्टडीची संकल्पना नाही. म्हणून जजने पत्नीला मुलांची केअरटेकर मानले आहे. त्यानंतरही माझी लढाई सुरू राहिली. फ्रान्स सरकार, ईयू संसद, संयुक्त राष्ट्र मानवी हक्क परिषदेकडेही अर्ज केले.

प्रत्येक ठिकाणी निराशा झाली. काेर्टाचा निवाडा आणि मुलांना पुन्हा भेटण्यासाठी खूप संघर्ष केला. त्यात नाेकरी, घर आणि जवळील पैसा गमावला. माझ्या वकिलांनी पत्नीच्या कायदेशीर प्रतिनिधींशी चर्चा केली. परंतु त्यांनी उत्तर देण्यास मनाई केली आहे. मला जे काही करता येऊ शकेल ते सर्व काही मी केले हाेते. मला केवळ मुलांची भेट घ्यायची आहे. मला त्यांच्यासाेबत जगायचे आहे. लेकरांपर्यंत पाेहाेचण्याचे सगळे मार्ग बंद झाले. तेव्हा मला हा मार्ग निवडावा लागला. उपाेषणावर बसण्याचे मी १० जुलै राेजी ठरवले.

मी माझ्या लेकरांच्या हक्कासाठी लढत आहे. त्यांच्या हक्काचा सन्मान झाल्यास मी उपाेषण संपवेल. आता १८ दिवस लाेटले आहेत. माझे वजन घटले. चक्कर येऊ लागते. पण ठीक आहे. परंतु तीन वर्षांपासून मुलांपासून दूर राहिल्याने झालेल्या वेदनेपेक्षा हा संघर्ष वाईट नाही. माझ्या भूमिकेवर मी ठाम आहे. जीवनाचा त्याग करण्यासही मी तयार आहे. त्यामागे नैराश्य नाही. अनेक नागरिक माझ्यासाेबत रात्रंदिवस असतात. एका याचिकेत ६२०० लाेकांनी स्वाक्षरी करून माझ्या माेहिमेला पाठिंबा दिला आहे. - विन्सेंट

बातम्या आणखी आहेत...